'नानू की जानू' या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांंच्या भेटीला

अभिनेता अभय देओलचा 'नानू की जानू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Mar 26, 2018, 09:46 PM IST
'नानू की जानू' या चित्रपटाचा  ट्रेलर चाहत्यांंच्या भेटीला  title=

मुंबई : अभिनेता अभय देओलचा 'नानू की जानू' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रीलीज करण्यात आला आहे. अभय देओल त्याच्या चित्रपटातून रसिकांचे हमखास निखळ मनोरंजन करतो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आगामी प्रोजेक्टबाबत कायम उत्सुकता असते. 

मजेशीर ट्रेलर 

अभय देओलच्या आगामी 'नानू की जानू' चित्रपटाचा ट्रेलरही मजेशीर आहे. हा ट्रेलर पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल हे मात्र नक्की. ट्रेलर पाहून ज्या घरात तो राहतो तेथे काही भूताटकी असल्याचं लक्षात येते. जो  त्याच्या घराची साफसफाई करते. या चित्रपटात अभय एका गुंडाच्या भूमिकेत आहे.

 

सपना चौधरीचा आयटम नंबर  

'नानू की जानू' या चित्रपटामध्ये हरियाणवी डांसर सपना चौधरीचा एक आयटम नंबरही आहे. या चित्रपटामध्ये अभय देओल आणि पत्रलेखा प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 20 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. पत्रलेखा आणि अभय यांचा हा पहिला एकत्र सिनेमा आहे. लवकरच अभय देओल ' हॅप्पी भाग जाएगी' या चित्रपटाच्या रीलीजमध्येही झळकणार आहे.