मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपांसंदर्भात 'सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने' (सिंटा) पाठवण्यात आलेल्या नोटीसला अभिनेता नाना पाटेकर यांनी उत्तर पाठवले आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. याविरोधात आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही नाना पाटेकर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासह चार जणांविरोधात पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून नाना पाटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांची ब्रेन मॅपिंग, नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणी करावी, अशी मागणीही केली होती.
#NanaPatekar has sent a detailed response to CINTAA over the notice they sent him based on complaint by #TanushreeDutta. In his response he stated allegations levelled against him are baseless&false, also stated that he is in process of adopting legal mesaures against Tanushree. pic.twitter.com/EMEdxcF4FS
— ANI (@ANI) October 18, 2018