Ranbir Kapoor on Raha : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहाचा जन्म झाल्यापासून सगळ्यांना तिचा चेहरा पाहायचा होता. मात्र, तिच्या जन्माच्या बरोबर 1 वर्षानंतर रणबीर आणि आलियानं राहाचा चेहरा पापाराझींना दाखवला. त्यानंतर तिच्या लूक्सवरून चांगलीच चर्चा रंगली होती. आता राहाविषयी रणबीरनं असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यानं वेधले आहे. खरंतर त्यानं म्हटलं की त्यांची लेक राहा ही आलियासारखी नसायला हवी.
रणबीरनं राहाचा जन्म झाल्यापासून त्याच्या मुलाखतींमध्ये तिच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात सगळ्यात जास्त तिच्या लूक्सवर होती की ती कोणासारखी दिसते. तर त्यावर त्याच्या कुटुंबातील लोकांची वेगवेगळी मतं आहेत असे त्यानं सांगितलं होतं. तर याविषयी बोलताना रणबीर म्हणाला की 'त्यानं आलियाला सांगितलं की माझी इच्छा आहे की तिनं तुझ्यासारखं दिसावं. पण माझी ही देखील इच्छा आहे की तिचा स्वभाव हा माझ्यासारखा असायला हवा. माझं जसं व्यक्तीमत्त्व आहे तसं तिचं असावं.'
गूडटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणबीरनं त्या मागचं कारण देखील सांगितलं की 'आलियाची पर्सनॅली लाऊड म्हणजेच बोल्ड आहे. ती खूप बोलते, तिच्यात खूप एनर्जी असते. तर त्याला एकच भीती आहे की घरात जर एकसारख्या दोन मुली असल्या तर त्याला त्या दोघींना सांभाळणं कठीण होईल. त्यासाठी त्याची इच्छा आहे की राहाचा स्वभाव त्याच्यासारखा असावा. मी जसा शांत आहे, तसं तिनं शांत असावं म्हणजे आम्ही दोघं मिळून आलियाला सांभाळू.'
पुढे रणबीरला विचारण्यात आलं त्यानं आयुष्यात अनेकांनी मने दुखावली तर त्यावर उत्तर देत तो म्हणाला, 'मी ही आशा करतो की राहा तशी नको.'
हेही वाचा : आईला पाहताच सलमाननं केलेलं 'ते' कृत्य पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक!
रणबीर आणि आलियानं राहाचा चेहरा क्रिसमसच्या दिवशी दाखवला होता. तेव्हापासून ती कशी दिसते यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु होती. काही नेटकऱ्यांनी म्हटलं की राहा ही आलिया सारखी दिसते तर काहींनी म्हटलं राहा ही राज कपूर यांच्यासारखी दिसते. तिच्याकडे पाहिल्यावर त्यांची आठवण येते. तर अनेकांनी म्हटलं की राहामध्ये कपूर कुटुंबातील लोकांची झलक दिसते. आलिया आणि रणबीर 14 एप्रिल 2022 रोजी लग्न बंधनात अडकले होते. तर राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला.