बबीताच्या स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा, यामुळे चाहतेच नाही तर जेठालाल ही तिच्यावर फिदा

तारक मेहता का उल्टा चष्मामधील मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Sep 14, 2021, 07:13 PM IST
 बबीताच्या स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा, यामुळे चाहतेच नाही तर जेठालाल ही तिच्यावर फिदा title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मामधील मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे आणि राज अनादकतचे नाव जोडताच ही बातमी जंगलातील आगीसारखी पसरली होती. आता मुनमुन दत्ता आणि राज अनादकत दोघांनीही यावर आपलं मत यावंर मांडलं आहे. आणि ही केवळ एक अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसं, आज आम्ही मुनमुन आणि राज यांच्याबद्दल बोलणार नाही आहोत, तर बबिताच्या स्टाईलबद्दल बोलणार आहोत.

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता जी खूपच मोहक आणि स्टायलिश आहे आणि खऱ्या आयुष्यातली मुनमुन दत्ता देखील अगदी तशीच आहेत. होय ... बबिती जी केवळ पडद्यावरच स्टाईलिश नाही तर ती स्क्रीनच्या बाहेरही पूर्णपणे स्टाईलीश राहते. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि इन्स्टाग्रामवरही तिचे फोटो शेअर करते सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते देखील आहेत. या चाहत्यांमध्ये अनेक हिरो हिरोईन्स दोखील मुनमुनला फॉलो करतात.

भारतीय लुक असो किंवा वेस्टन स्टाईल असो, मुनमुन दत्ता प्रत्येक स्टाईलमध्ये कहरच करते आणि प्रत्येक पोशाखात ही बंगाली अभनेत्री सुंदरच दिसते. यामुळेच मालिकेत  मुनमुन दत्तामध्ये अशी गोष्ट नक्कीच खास आहे. ज्यामुळे जेठालालही तिच्यावर फिदा आहे.