MMS व्हायरल झाल्यानंतर मुनव्वर फारुकीचं अंजली अरोराबाबत मोठं वक्तव्य

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी याने कंगना राणौतच्या टीव्ही रिअॅलिटी शो लॉकअपचा किताब जिंकला

Updated: Aug 25, 2022, 11:24 PM IST
MMS व्हायरल झाल्यानंतर मुनव्वर फारुकीचं अंजली अरोराबाबत मोठं वक्तव्य title=

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी याने कंगना राणौतच्या टीव्ही रिअॅलिटी शो लॉकअपचा किताब जिंकला, त्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये सोशल मीडिया सेन्सेशन अंजली अरोराही दिसली होती. या शोमध्ये दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ दिसले होते.

त्यामुळे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, नंतर दोघांनीही आपण फक्त चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर ते पुन्हा एकत्र दिसल्याची बातमी आली होती. मात्र मुनव्वरने अंजलीसोबत काम करण्यास नकार दिल्याचं समजतंय.

मुनव्वरने एकत्र काम करण्यास दिला नकार
लॉकअप शोमध्ये मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोरा यांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर एका वृत्तानुसार, दोघंही पुन्हा कोणत्यातरी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार होते. परंतु सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटलं आहे की, मुनव्वर यांनी अंजलीसोबत काम करण्यास नकार दिला आहे.

मुनव्वरच्या खास व्यक्तीच्या सांगण्यावरून मुनव्वरने हे कृत्य केल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. मुनव्वरला आपल्या जवळच्या व्यतीला दुखवायचं नव्हतं, त्यामुळे त्याने अंजलीसोबत काम करण्यास नकार दिला. ती खास आणि जवळची व्यक्ती कोण आहे याबद्दल माहिती नसली तरी. यासंदर्भात मुनव्वर किंवा अंजलीच्या बाजूने कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.