मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री अनन्या पांडेवर कारवाई, शूटिंग दरम्यान घडली घटना

 'गेहराईया' या  सिनेमाच्या रिलीजनंतर अनन्या पांडे खूपच चर्चेत आहे. 

Updated: Feb 19, 2022, 07:45 PM IST
मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री अनन्या पांडेवर कारवाई, शूटिंग दरम्यान घडली घटना title=

मुंबई : 'गेहराईया' या  सिनेमाच्या रिलीजनंतर अनन्या पांडे खूपच चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाने करोडो लोकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आता तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या अनन्या पांडे तिच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग मुंबईत करत आहे. 

नुकतंच असं समोर आलं आहे की, अनन्या पांडे मुंबईतील एका स्टुडिओमध्ये शूटिंग करत असताना मुंबई पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत तिची कार लॉक केली होती. केवळ अनन्या पांडेची कारच नाही तर अनेक क्रू मेंबर्सची कारही मुंबई पोलिसांनी लॉक केली होती. मुंबई पोलिसांनी असं पाऊल का उचललं हे जाणून घ्या.

मुंबई पोलिसांनी लॉक केली अनन्या पांडेची कार
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री मुंबईतील एका स्टुडिओमध्ये तिच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करत होती. यादरम्यान अनन्या पांडेची कार स्टुडिओबाहेर उभी होती. ही जागा स्टुडिओची इक्विपमेंट ठेवण्यासाठी होती.  मात्र तिथेच अभिनेत्रीने तिची गाडी तिथे पार्क केली होती. असं सांगण्यात येत आहे. केवळ अनन्या पांडेच नाही तर अनेक क्रू मेंबर्सची गाड्याही तिथे पार्क केल्या होत्या.  

अशा ठिकाणी कार पार्क केल्यामुळे मुंबई पोलिसांनी तिची कार लॉक केली. अभिनेत्रीसोबतच ज्या लोकांची कार जेथे होती तिचीही गाडीही लॉक करण्यात आली आहे.अनन्या पांडेच्या सुरक्षा टीमने मुंबई पोलिसांशी बोलून हे प्रकरण मिटवलं. लवकरच मुंबई पोलीस तिची कार देखील सोडणार आहेत. पण यासोबतच अभिनेत्रीलाही वॉर्निंग दिली जाणार आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, गेहराईया हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनन्याच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडा यांच्या 'लेगर' या चित्रपटात दिसणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत खो गए हम कहाँ भी है या चित्रपटातही अभिनेत्री झळकणार आहे.