श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या या चांदणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 25, 2018, 03:26 PM IST
श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO) title=

मुंबई : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या या चांदणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत श्रीदेवी डान्स करताना दिसत आहे. श्रीदेवी यांच्यासोबत या व्हिडिओत सुप्रसिद्ध निवेदक आणि अभिनेता मनीष पॉलही दिसतो आहे.

श्रीदेवी या आपल्या पुतण्याच्या विवाहासाठी दुबईला गेल्या होत्या.  हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा दुबईतच मृत्यू झाला. शनिवारी रात्री १२च्या दरम्यान ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूसमयी पती बोनी कपूर आणि त्यांची छोटी बहिण त्यांच्या सोबत होती.