कंगनाने महाराष्ट्र महिला आयोगावर केलेले आरोप खोटे - विजया रहाटकर

काही दिवसांपूर्वी कंगना रणावतने एका टेलिव्हिजन टॉक शो मध्ये दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 6, 2017, 04:13 PM IST
कंगनाने महाराष्ट्र महिला आयोगावर केलेले आरोप खोटे - विजया रहाटकर    title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी कंगना रणावतने एका टेलिव्हिजन टॉक शो मध्ये दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यात ती हृतिक सोबत असलेल्या तिच्या नात्याविषयी देखील मोकळेपणाने बोलली आणि त्यात तिने त्याच्यावर आरोप देखील केले. इतकंच नाही तर कंगनाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगावर देखील आरोप केले. 

हृतिकने त्रास दिल्यानंतर महिला आयोगाची मदत का घेतली नाही, असा मुलाखतीदरमान्य प्रश्न विचारल्यानंतर तिने सांगितले की तिला महिला आयोगाकडून कोणतीच मदत झाली नाही. कंगनाने शो मध्ये सांगितले की, मी मदतीसाठी मुंबई ब्युरोच्या हेड गुरमीत चड्ढासोबत बातचीत केली होती आणि सुरुवातीला त्यांनी हाय प्रोफाईल केस यासंदर्भात खूप उत्साह देखील दाखवला. परंतु, त्यानंतर २-३ दिवसांनी मला राकेश रोशनच्या ऑफिसमधून फोन आला आणि गुरमीत चड्ढा माझे खूप चांगले मित्र आहेत, असे सांगण्यात आले. येथे अनेक लोक विकले जातात, असा सनसनाटी आरोप देखील त्यांनी केला. तेव्हापासून वुमन कमिशनबद्दल मनात राग, द्वेष निर्माण झाला आहे. 

कंगनाने केलेल्या या आरोपानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या चेयरमन विजया रहाटकर यांनी ट्वीट करून सांगितले की, कंगनाने केलेले आरोप चुकीचे आहेत. विजया यांनी तीन ट्वीट केले. एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "कंगना रणावतने महिला आयोगावर अत्यंत बेजबाबदारपणे आरोप केले आहेत. त्यामुळे मी अत्यंत चिंतीत आहेत."

दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, "कंगनाने कधीच महिला आयोगाला संपर्क केला नव्हता आणि गुरमीत चड्ढा देखील एमएससीडब्ल्यूशी जोडलेले नाहीत. 

तिसऱ्या ट्वीटमध्ये विजया यांनी लिहिले की, "संकटकाळात एमएससीडब्ल्यू नेहमीच महिलांची मदत करण्यास सज्ज आहे. कंगनाने आम्हाला ज्या पद्धतीने प्रस्तुत केले ते अत्यंत दुर्दैवी आहे."

तसंच या शो मध्ये कंगनाने सांगितले की, "अवॉर्ड फंक्शन्स देखील फेक असतात. म्हणून मी या सगळ्यापासून दूर राहते." त्याचबरोबर तिने बॉलिवूडशी संबंधित अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा केली.