'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर

Mrunal Thakur नं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. मृणालनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की तिला काय झालं आहे? तिच्या आयुष्यात सगळं ठीक आहे ना? पण अचानक मृणालनं असा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. 

Updated: Mar 22, 2023, 11:37 AM IST
'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर

Mrunal Thakur Emotional : छोट्या पडद्यावरील कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरनं (Mrunal Thakur) बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले. चित्रपटांमध्ये मृणालनं एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या. मृणालनं हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'सुपर 30' (Super 30) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मृणाल फक्त बॉलिवूडमध्ये चित्रपटकरून थांबली नाही तर तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदरार्पण केलं. मृणालनं ‘सीता रामन’ या तेलुगू चित्रपटातही भूमिका साकारली. दरम्यान, मृणाल एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आली आहे. मृणालचा एक रडतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे नक्की मृणालला काय झालं हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मृणालनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत मृणाल रडताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत मृणालनं कॅप्शन दिलं की, 'कालचा दिवस कठीण होता, पण आज मी अजून स्ट्रॉंग, समजुतदार आणि आनंदी आहे,  प्रत्येकाच्या आयुष्यातील कथांमध्ये अनेक पानं आहेत, परंतु प्रत्येकजण ती मोठ्याने वाचत नाही, परंतु मी माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील काही पाने मोठ्याने वाचणार आहे कारण या परिस्थितीतून मी जो धडा शिकले तोच धडा कदाचित आणखी कोणीतरी शिकण्याची गरज आहे. रोज एक दिवस नव्याने जगत आहे.  कधीतरी भोळं आणि असुरक्षित वाटण्यात काहीच गैर नाही.'

Mrunal Thakur got Emotional shares crying photo

मृणालनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच तिनं एक व्हिडीओ देखील शेअर केला. या व्हिडीओत मृणाल बोलताना दिसते की 'काल मला खूप वेगळं आणि असहाय्य वाटत होते. पण आज मी खूप आनंदी आहे.'

हेही वाचा : Dombivli Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...

मृणालच्या कामाविषयी बोलायचं झालं तर अलीकडेच मृणालनं नुकतीच खिलाडी कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) 'सेल्फी' (Selfiee) चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात ती एका गाण्यात दिसली होती. त्या गाण्याचं नाव 'कुडिए तेरी बाइव' असं आहे. हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं आहे. तर या आधी मृणाल, अभिनेता शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) 'जर्सी' (Jersey)या चित्रपटात दिसली होती. लवकरच मृणाल ही अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत (Aditya Roy Kapoor) 'गुमराह' चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, हा चित्रपट 7 एप्रिल रोजी आपल्या सगळ्यांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.