Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...

Gudi Padwa Aksash Thosar in Dombivali Shobhayatra 2023: आज गुढीपाडव्याचा सण सगळीकडेच (Gudi Padwa Shobha Yatra 2023) उत्साहानं साजरा होतो आहे. तेव्हा मराठी सेलिब्रेटींनीही यावेळी शोभायात्रांमध्ये सहभाग दाखवला आहे. अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar Gudi Padwa) यांनंही डोबिंवलीच्या शोभयात्रेत आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. 

Updated: Mar 22, 2023, 11:07 AM IST
Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...
Gudi Padwa 2023 Sairat fame actor akash thosar celebrates gudipadwa with co actor sayali patil in dombivali shobha yatra for promoting his marathi film ghar banduk biryani

Gudi Padwa Aksash Thosar 2023: गुढीपाडव्याचा सण आज सगळीकडेच (Gudi Padwa 2023) उत्साहात साजरा केला जातो आहे. करोनाच्या सावटानंतर तब्बल 3 वर्षांनी आपण सर्वच जण हा आपला आवडता सण निर्बेंधमुक्तीच्या छायेखाली साजरा करतो आहोत. मराठी प्रेक्षकांसाठीही त्यांचे आवडते मराठी सेलिब्रेटी हे गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये (Gudi Padwa Miravnuk Live) उत्साहासानं सहभागी झाले आहेत. तेव्हा यंदा गुढीपाडव्याच्या मिरवणूकीतही सेलिब्रेटींचा (Gudi Padwa Marathi Celebrity) जल्लोष पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरात जिथे कुठे मराठी प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना मिरवणूकीत पाहणं ही एक पर्वणीच असते. 'सैराट' चित्रपटामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता आकाश ठोसरनंही गुढीपाडव्याच्या (Akash Thosar in Gudi Padwa Rally Dombivali) रॅलीत सहभाग घेतला होता. यावेळी तो डोबिंवलीच्या गुढीपाडवा शोभयात्रेत (Gudi Padwa Shobha Yatra 2023) जल्लोषात सहभागी झाला होता. (Gudi Padwa 2023 Sairat fame actor akash thosar celebrates gudipadwa with co actor sayali patil in dombivali shobha yatra for promoting his marathi film ghar banduk biryani)

नागराज मंजुळे यांच्या घर बंदूक बिर्यानी या चित्रपटाचे सध्या प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटातून आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटील यांची रोमॅण्टिक जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या त्याच्या फॅन्सना कोण उत्सुकता लागून राहिली आहे. आपल्या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता आकाश ठोसर यावेळी डोबिंवलीच्या गुढीपाडव्याला खासकरून सहभागी झाला होता. त्याच्यासोबत यावेळी अभिनेत्री सायली पाटील हिनंदेखील हजेरी लावली होती. 

आकाश आणि सायलीनं यावेळी प्रेक्षकांना आणि त्यांच्या फॅन्सना नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच यावेळी सायली आणि आकाशनं लेझिमवर ठेका धरला आणि जमलेल्यांसोबत त्यांनी गुढीपाडव्याच्या सणात सगळ्यांच्या आनंद सहभाग घेतला. यावेळी सायलीनं जांभळ्या रंगाची रेशमी काठपदराची साडी आणि रेशमी हिरवा ब्लाऊज परिधान केला होता. यावेळी तिनं ग्लॅमरस अंदाजमध्ये एलिगन्ट आणि स्टायलिश मराठमोळा लुक कॅरी केला होता. नाकात नथ तर सोन्याचे दागिने घातले होते. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर आकाशनं पोपटी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याचा स्वॅग पाहून मुली नक्कीच फिदा झाल्या असतील. 

आकाश ठोसर आणि सायली पाटील यांची जोडी सध्या इंटरनेटवर भाव खाते आहे. त्यांचे अनेक व्हिडीओजही सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचा बिंदू ठरले आहेत. आज गुढीपाडव्याच्या खास सणानिमित्तानंही त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे यात ते एकत्र गुढीपाडव्याच्या रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेता आकाश ठोसरला परश्या म्हणून सगळेच ओळखतात. सैराटच्या यशानंतर आकाशच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यानं यापुढे मराठीच काय तर हिंदी चित्रपटांमधूनही कामं केली आहे. सायली पाटील या अभिनेत्रीचा हा पहिलाच बिग बजेट सिनेमा आहे.