'या' अभिनेत्रीची माणुसकी पाहून चाहते म्हणाले, ''करीनानेही तिच्याकडून शिकावं...'' पाहा Video

पण नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून मौनी रॉयने आपल्या चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली आहेत. 

Updated: Aug 12, 2022, 05:10 PM IST
'या' अभिनेत्रीची माणुसकी पाहून चाहते म्हणाले, ''करीनानेही तिच्याकडून शिकावं...'' पाहा Video title=

Mouni Roy Video: आपल्या मोहक अदांनी सगळ्यांनाच घायाळ करणाऱ्या मौनी रॉयचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सतत सोशल मीडियावर आपले हॉट फोटोज टाकून आपल्या चाहत्यांनी ती अपडेट करत असते. गेली कित्येक वर्षे ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आहे.

आपल्या करिअरमध्ये तिने तिचा असा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून मौनी रॉयने आपल्या चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली आहेत. 

मौनी रॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती दोन गरीब महिलांना मिठी मारताना दिसत आहे. या व्हिडिओवर लोकांनी अनेक संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक लोकांनी मौनीचे कौतुक केले आहे.

हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटच्या बाहेरचा आहे. मौनी या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली असताना तिला काही गरीब महिला भेटल्या. त्या त्यांच्या तिच्याकडे पैसे मागत होत्या. पण आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून ती त्यांना पैसे देऊ शकत नव्हती. तेव्हा त्यांना सॉरी म्हणून त्यांना तिने मिठी मारली आणि त्यामुळे त्या महिलांच्या चेहऱ्यावरही स्मित उमटले. 

मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत डिनर डेटवर गेली होती. रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यावर काही महिलांनी तिच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. त्या महिला मौनीला म्हणाल्या, तू जे काही करतेस ते मनापासून कर, यावर मौनीने पुढे जाऊन तिला मिठी मारली. त्याचबरोबर मौनी म्हणाली, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, सॉरी. 

त्या गरीब महिलांसोबत त्यांची मूलही होती. मौनीने त्यांचीही प्रेमाने विचारपूस केली. 

मौनीच्या या व्हिडिओवर लोकांनी कमेंट्सचा पाऊस केला आहे. अनेकांनी मौनीसाठी हार्ट इमोजीही कमेंटमध्ये टाकले आहे.

अनेकांनी मौनी रॉयप्रती आदरही व्यक्त केला आहे. अनेकांनी मौनीला दयाळू, प्रेमळ अशा उपमाही दिल्या आहेत. तर काहींनी तिच्यावर टीका करत हे सर्वकाही प्रसिद्धीसाठी सुरू आहे असं म्हणत तिला टोलाही लगावला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी रॉयने या आउटिंगमध्ये काळा-पांढरा पारदर्शक बॅकलेस फ्रॉक परिधान केला होता. त्यात ती सुंदर दिसत होती. मौनी रॉयने यावर्षी जानेवारीत सूरज नांबियारशी लग्न केले. मौनी रणबीर कपूर-आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.