आजीच्या दुखद निधनाने आई नम्रता शिरोडकरला बिलगून मुलगी ढसाढसा रडली, महेश बाबूने असं सावरलं... पाहा Video

इंदिरा देवी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पूर्ण साउथ इंडस्ट्रीमध्ये (South Industry) शोककळा पसरली.

Updated: Sep 28, 2022, 07:37 PM IST
आजीच्या दुखद निधनाने आई नम्रता शिरोडकरला बिलगून मुलगी ढसाढसा रडली, महेश बाबूने असं सावरलं... पाहा Video title=
Mother Namrata Shirodkar daughter cried after the death of her grandmother Mahesh Babu recovered like this NZ

Mahesh Babu Daughter: साउथ चित्रपटातील सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांची आई इंदिरा देवीचे निधन झाले. इंदिरा देवी गेल्या खूप वर्षांपासून आजाराने त्रस्त होत्या. हैदराबादच्या एआईजी हॉस्पीटलमध्ये त्यांचे उपचार चालू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना वेंटिलेटरवर (ventilator) शिफ्ट करण्यात आले होते. आज म्हणजेच 28 सप्टेंबरला महेश बाबूच्या आईने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. इंदिरा देवी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पूर्ण साउथ इंडस्ट्रीमध्ये (South Industry) शोककळा पसरली. (Mother Namrata Shirodkar daughter cried after the death of her grandmother Mahesh Babu recovered like this NZ)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पद्मालय स्‍टूडियोत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते त्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल (Viral) होताना दिसत आहेत. दुपारी 1 वाजता प्रस्थानममध्ये इंदिरा देवी यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्या व्हिडीओत महेश बाबू यांचा उदास चेहरा पाहायला मिळाला तर त्यांची लेक सितारा तिने रडून हौदोस घातलेला पाहायला मिळाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओत सितारा आजीच्या पार्थिवाजवळ उभी आहे आणि ती आपल्या आईच्या म्हणजेच नम्रता शिरोडकर यांच्या खाद्यांवर डोके ठेवून स्वत:ला रडून बेहाल केले आहे. लेकीला रडताना पाहून महेश बाबू तिला संभाळत होते. सिताराचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या ही डोळ्यात पाणी येईल. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आईच्या निधनानंतर महेश बाबू यांनी त्यांच्या इंन्सटग्रामवर (Instagram) इंदिरा देवी यांचा एक ब्लॅक ॲन्ड व्हाईट (Black & White) फोटो शेअर केला आहे. 

आणखी वाचा - एक वर्षापूर्वीचं 'ते' प्रकरण कपूर कुटुंबाला भोवणार; एकता कपूर आणि आई शोभा यांना अटक वॉरंट जारी