तुम्ही देखील तुमच्या मुलासाठी असाचं विचार करताय? तैमूरबद्दल करिनाचा मोठा निर्णय

 'लाल सिंग चढ्ढा' हा तिचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. 

Updated: Jul 24, 2022, 04:54 PM IST
तुम्ही देखील तुमच्या मुलासाठी असाचं विचार करताय? तैमूरबद्दल करिनाचा मोठा निर्णय title=

Kareena Kapoor Khan : करिना कपूर खान सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'लाल सिंग चढ्ढा' हा तिचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. या चित्रपटातून आमीर आणि करिना एकत्र दिसणार आहेत. आमीर आणि करिनाचा 2009 साली प्रदर्शित झालेल्या 'थ्री ईडियट्स' या चित्रपटानंतरचा हा दुसरा एकत्र सिनेमा असणार आहे. या चित्रपटातूनही ते दोघे पुन्हा रोमॅन्टिंक भुमिकेतून दिसणार आहेत. 

करिना कपूर खान ही नुकतीच आपला मुलगा तैमूरसह आणि परिवारासह लंडनमध्ये गेली होती. काही दिवसांपुर्वीच ती भारतात परतली आहे. आपल्या लंडन ट्रीपचे खास फोटो तिने इन्टाग्रामवर शेअर केले होते. तेव्हा तिच्या तिसऱ्या प्रेगंनन्सीबद्दल अनेक चर्चा होत होत्या. सध्याही करिना आपल्या तिसऱ्या प्रेगंनन्सीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. 

पण आता करिना कपूर खान आणखीन एका कारणासाठी चर्चेत आली आहे. ते कारणही खास आहे. तैमूर अली खानच्या संगोपनाबद्दल करिनाने अजून एक खुलासा केला आहे. तिचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे ज्यात तिने तैमूरच्या बालसंगोपनाबद्दल सांगितले आहे. ती म्हणते की, ''लहान मुलांना आपण आत्तापासूनच योग्य संस्कार देणे गरजेचे आहे. त्यासाठी मीही त्याला स्त्रीयांचा आदर कसा करायचा याचे धडे आत्तापासूनच देणार आहे. त्यासाठी मी प्रयत्न केला आहे'', असा खुलासा करिनाने केला आहे. करिनाला आजही तैमूरबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात आणि तीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देते. 

आपल्या तिसऱ्या प्रेगंन्सीबद्दल करिनाने स्वतःहून काही खुलासा केलेला नाही परंतु ती गरोदर नसल्याचीही चर्चा एकीकडे होते आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खानसह सध्या करिना आपले पर्सनल लाईफ एन्जॉय करते आहे. 

सध्या करिना कपूर चित्रपटांमध्ये फारशी रमली नसून सध्या ती कोणत्या चित्रपटाचे शूटिंगही करत नाहीये. सध्या ती आपल्या दोन्ही मुलांसह वेळ घालवता दिसते आहे. त्यामुळे सध्या तिच्यासाठी तिचा फॅमिली टाईम खूप महत्त्वाचा ठरला आहे.