'आमिर मला म्हणाला हा टिव्ही शो नाही तू...', मोना सिंहने सांगितला 3 Idiots च्या शुटिंगचा किस्सा!

Mona Singh recalls 3 Idiots rehearsals: मिस्टर परफेक्ट आमिर खानसह मोना सिंहने काही सीन शुट केले होते. मुलाखतीत मोनाने आमिर खानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. 

Updated: Aug 18, 2023, 06:53 PM IST
'आमिर मला म्हणाला हा टिव्ही शो नाही तू...', मोना सिंहने सांगितला 3 Idiots च्या शुटिंगचा किस्सा! title=
Mona Singh

Mona Singh On Aamir Khan: मेड इन हेवन सीझन 2 मुळे (Made in Heaven Season 2) सध्या अभिनेत्री मोना सिंह पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या अभिनयामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होताना दिसतोय. अशातच गॅलट्टा प्लसला दिलेल्या मुलाखतीत मोना सिंहने (Mona Singh) मोठा खुलासा केला आहे. राजकुमार हिरानी यांच्या 3 इडियट्सच्या (3 Idiots) प्रदीर्घ तासांच्या रिहर्सलविषयी तिने अनेक किस्से सांगितले आहेत. त्यावेळी अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) दिलेला एक सल्ला तिला कसा कामी पडला, त्यावर तिने भाष्य केलं आहे.

बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरलेल्या 3 इडियट्समध्ये मोना सिंगने करीना कपूरच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यावेळी तिने मिस्टर परफेक्ट आमिर खानसह काही सीन शुट केले होते. मुलाखतीत मोनाने आमिर खानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. 

नेमकं काय म्हणाली मोना सिंग?

सिनेमाच्या शुटींगवेळी मला रिहर्सलचा कंटाळा आला होता. टीव्ही अभिनेत्री म्हणून मला रिहर्सलची सवय नव्हती, असं मोना सिंग म्हणते. जेव्हा मी 3 इडियट्सचे शूटिंग करत होते, तेव्हा मी पहिल्यांदाच संपूर्ण टीमसोबत काम करत होते आणि मी आमिर सरांना पाहिलं आणि मला असं वाटलं, 'अरे देवा, तो काय करतोय?' आम्ही जवळपास 100 रिहर्सल केल्या होत्या, असा किस्सा मोना सिंगने सांगितला.

आम्ही इतक्या रिहर्सल का करत आहोत? असा सवाल मोनाने आमिर खानला विचारला. मोना हा चित्रपट आहे. तू काय बोलतीयेस? हा एक टीव्ही शो नाही जिथं उद्या एक भाग निघणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. आपल्याला कष्ट करावे लागतील, असं आमिर खान म्हणाला, असं मोना सांगते.

आणखी वाचा - 'हे तीन जण तर मजबूत अडकलेत!' प्राजक्ता माळीच्या पोस्टनंतर सगळीकडे एकच खळबळ

दरम्यान, तो प्रत्येक टेक आणि प्रत्येक रिहर्सलमध्ये खूप चांगला आहे, तो त्याच्या भावना, त्याच्या प्रतिक्रिया बदलत राहतो, तो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं पात्र जगतो, असंही मोना सिंह म्हणते.