Baby Shower मधील Bipasha Basu चा बेबीबंपसोबत क्यूट डान्स Video व्हायरल

Bipasha Basu : या सोहळ्यातील बिपाशा बेबी बंपसोबत (Baby bump) डान्स करतानाचा क्यूट व्हिडीओ (Cute video) समोर आला आहे. 

Updated: Sep 24, 2022, 01:08 PM IST
Baby Shower मधील Bipasha Basu चा बेबीबंपसोबत क्यूट डान्स Video व्हायरल title=
Mommy to be Bipasha Basu dancing at Baby Shower video viral on Social Media NM

Bipasha Basu Baby Shower : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) हीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गूड न्यूज दिली.  बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan singh grover) यांनी बेबी बंपसोबत केलेला फोटोशूटने अनेकांचे लक्ष वेधले. त्यानंतर गुलाबी साडीत बिपाशाचे डोहाळ जेवणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झाले. पारंपरिक बंगाली पद्धतीने बिपाशाच्या आईने तिचे डोहाळे पूरवले. 

त्यानंतर मुंबईत शुक्रवारी 23 सप्टेंबरला बिपाशा बसू हिच्यासाठी खास Baby Shower चं आयोजन करण्यात आलं होतं.  मुंबईच्या लोअर परेल येथील एका मॉलमध्ये या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बिपाशा (Bipasha Basu) आणि करणचे कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी सुंदर सजावट करण्यात आली होती. या सोहळ्यातील बिपाशा बेबी बंपसोबत (Baby bump) डान्स करतानाचा क्यूट व्हिडीओ (Cute video) समोर आला आहे. (Mommy to be Bipasha Basu dancing at  Baby Shower video viral on Social Media NM)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Desimartini Movies (@desimartinimovies)

होणारी आई बिपाशा बेबी पिंक मॅक्सी गाऊनमध्ये तर होणारे बाबा करण सिंग ग्रोव्हर निळ्या रंगाच्या सूट घालून आले होते. या व्हिडीओमध्ये दोघेही फोटोंमध्ये खूप आनंदी दिसत आहेत. बिपाशा बसू आणि करणने केक कापून हा आनंद साजरा केला. 

बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर दोघेही खूप उत्साहित आहेत आणि त्यांना त्यांचा वेळ पूर्णपणे मुलाला द्यायचा आहे, त्यामुळेच बिपाशा सध्या कोणताही प्रोजेक्ट हातात घेत नाहीये. सध्या तिचे लक्ष तिच्या मुलावर आहे.