अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने अभिनेत्रीचा मृत्यू

तारूण्यातील नशेने तिला आयुष्यातून उठवले..

Updated: May 29, 2018, 11:21 AM IST
अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने अभिनेत्रीचा मृत्यू title=
छायाचित्र सौजन्य:olya langille फेसबुक

फ्लोरिडा : अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री ओल्या लँगिले हिचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. एका डॉक्टरच्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यामुळे ओल्याचा मृत्यू वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नुकताच या मृत्यूबाबतचा शवविच्छेदन आणि तपास अहवाल पुढे आला आहे. या अहवालात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, ओल्या लँगिलेचा मृत्यू हा अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने झाला. अहवालात म्हटले आहे की, मृत्यू झाल्याच्या रात्री तिने अंमली पदार्थांचे सेवन अतिप्रमाणात केले होते तसेच, त्या रात्री तिच्यासोबत मोठ्या प्रमाणावर शरीरसंबंधही करण्यात आले होते. रात्रभर पार्टी केल्यावर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनीही म्हटले आहे की, अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने तिचा मृत्यू झाला आहे.

स्पोर्टबारमध्ये झाली भेट

ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडली. १८ वर्षीय मॉडेल ओल्या लँगिले हिचा मृतदेह डॉ. नवल पारीख यांच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला. डॉक्टर पारीख यांनी तपास अधिकाऱ्याला सांगितले की, ओल्या सोबत त्यांची भेट एका स्पोर्ट बारमध्ये झाली. दोघांनीही तेथे खूप प्रमाणावर मद्यसेवन केले आणि त्यानंतर ते अपार्टमेंटमध्ये गेले. त्यानंतर दोघांनीही मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे सेवन केले आणि भरपूर प्रमाणात शरीरसंबंधही केले.

कोकेनच्या पुड्या आणि नग्नावस्थेतील मृतदेह

डॉ. पारीख यांनी पुढे सांगितले की, मध्यरात्री डॉक्टरांनी ओल्याला शरीराला आचके मारताना पाहिले होते. मात्र, काही काळाने ती पूर्ववत (नॉर्मल) झाली. दरम्यान, सुर्योदय होताच ते तिला झोपेतून उठवायला गेले असता तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्यांनी फोनद्वारे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना ओल्याचा मृतदेह नग्नावस्थेत मिळाला. तसेच, तिच्या बिछान्याशेजारी कोकेनच्या बऱ्याच पुड्या मिळाल्या.

कोणतेही षडयंत्र नाही - पोलीस

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या माहितीनुसार, मॉडेल ओल्या लँगिले हिचा मृतदेह अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला आहे. तिच्या मृत्यमागे कोणतेही षडयंत्र नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, लँगिलेच्या कुटुंबियांना दावा केला आहे की, डॉ. पारेख यांनी तिच्यासोबत केलेले शरीरसंबंध हे तिची मान्यता नसताना केले होते.