ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी Janhavi kapoor नं केले होते प्रयत्न? वाचा नेमकं प्रकरण

ज्यांना अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं असं वाटतं नव्हतं त्यामध्ये अशाच एका अभिनेत्रीचा समावेश होता.

Updated: Sep 18, 2022, 07:13 PM IST
ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी Janhavi kapoor नं केले होते प्रयत्न? वाचा नेमकं प्रकरण  title=

Aishwarya and Abhishek Bachchan Throwback: ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला 15 वर्षे पुर्ण झाली आहेत. आजही हे बॉलीवूडचं कपल सगळ्यांसाठी आयडियल कपल आहे. अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनने 20 एप्रिल 2007 रोजी मिस वर्ल्ड अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केले. (Aishwarya and Abhishek Marriege) या दोघांच्या लग्नाच्या वेळी चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खूपच उत्सुकता होती, तर दुसरीकडे असे अनेकजण होते ज्यांना ऐश्वर्या आणि अभिषेकने लग्न करावे असंही वाटत नव्हतं. (model and actress of film das janhavi kapoor who tried to stop bollywood couple aishwarya and abhisheks wedding)

ज्यांना अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं असं वाटतं नव्हतं त्यामध्ये अशाच एका अभिनेत्रीचा समावेश होता आणि ती अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी कपूर म्हणजे श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर नव्हे तर 'दस' या चित्रपटातील अभिनेत्री आणि मॉडेल जान्हवी कपूर. (Actress from Das film Janhavi Kapoor)

एकीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचं लग्न सुरू होतं, तर दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी कपूरनं स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला, हे प्रकरण त्यावेळी खूपच गाजलं होतं. जान्हवीने तेव्हा असं सांगितलं होतं की तिचं याआधीच अभिषेक बच्चनसोबत लग्न झालं आहे आणि ती त्याची पत्नी आहे. एवढेच नाही तर जान्हवीने मीडियासमोर स्वतःला इजा करण्याचा आणि तिने जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्नही केला होता. 

जान्हवी कपूरनं मीडियासमोर अभिषेकवर आरोप केला की त्याने तिची फसवणूक केली आहे, जेव्हा अभिषेक बच्चनने आरोप फेटाळून लावले तेव्हा या मॉडेलनं अभिषेकच्या घराबाहेर आपले मनगट कापण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे अभिषेकवरील आपलं प्रेम सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला होता. 

लक्षात ठेवा की येथे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरबद्दल बोललं जात नाहीये तर आम्ही तुम्हाला त्याचं नावाच्या एका मॉडेलबद्दल सांगत आहोत. ही अभिनेत्री जान्हवी कपूर एक मॉडेल असून अभिनेत्रीनं अभिषेक बच्चनसोबत 'दस' चित्रपटात काम केलें होतं.