इंटरनेटवर व्हायरल होत असलेला 'हा' डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

आपली कला, कौशल्य, टॅलेंट दाखवण्यासाठी आजची तरूणाई इंटरनेटचा जबरदस्त वापर करते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 20, 2018, 12:18 PM IST
इंटरनेटवर व्हायरल होत असलेला 'हा' डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिला का? title=

नवी दिल्ली : आपली कला, कौशल्य, टॅलेंट दाखवण्यासाठी आजची तरूणाई इंटरनेटचा जबरदस्त वापर करते. आजकाल आपण इंटरनेटवर विविध प्रकारचे व्हिडिओज बघतो. आपल्याला कल्पना नाही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात. डान्सचे अनेक व्हिडिओज आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघतो. असाच एक व्हिडिओ ज्यात दोन मुले आणि एक मुलगी आपली कला सादर करत आहे.

व्हिडिओ व्हायरल 

Sumit Parihar नावाच्या युट्युब चॅनलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तो खूप व्हायरल होत आहे. यात एक मुलगी दोन मुलांसह लोकप्रिय पंजाबी पॉप सिंगर हार्डी संधूच्या प्रसिद्ध गाण्यावर 'नाह' वर धमाकेदार डान्स करत आहे. 

३ लाख लोकांना पाहिला हा व्हिडिओ

या महिन्याच्या १३ तारखेला हा व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सुमारे ३ लाख लोकांनी पाहिला असून त्यावर खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेल्या या व्हिडिओची कोरियोग्राफी सुमित परिहार याने केली आहे.

कोण आहे ही डान्सर?

बिग बॉस ९ ची एक्स कंटेस्टेंट असलेल्या मॉडल-अभिनेत्री नोरा फतेही ने हा जबरदस्त डान्स केला आहे. हे गाणे देखील प्रेक्षकांच्या चांगलेच आवडीचे आहे. नोरा ही उत्तम डान्सर असून अलीकडेच तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. नोराचा 'टाइगर जिंदा है' च्या 'स्वैग से स्वागत' गाण्यावरचा डान्स व्हिडिओ सुमारे ३२ लाखाहून अधिक लोकांनी बघितला होता.