राज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार

Raj Thackeray diwali gift to Amruta Khanvilkar : राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवली दिवाळीची खास पोस्ट अभिनेत्री पोस्ट शेअर करत मानले आभार.

दिक्षा पाटील | Updated: Nov 10, 2023, 05:28 PM IST
राज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार title=
(Photo Credit : Social Media)

Raj Thackeray diwali gift to Amruta Khanvilkar : दिवाळीचा सण हा सगळ्यांसाठी आनंदाचा असतो. दिवाळीचे हे पाच दिवस सगळ्यांसाठी आनंदाचे असतात. सगळे लोक आपल्या जवळच्या लोकांना मिठाई आणि भेट वस्तू देताना दिसतात. यात फक्त सर्वसामान्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. ते देखील एकमेकांना दिवाळीच्या निमित्तानं भेटवस्तू पाठवताना दिसतात. त्यांत अनेक राजकारणी देखील असतात. असंच काही सेलिब्रिटींसोबत झालंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनेक कलाकारांना भेटवस्तू पाठवल्या आहेत. 

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्याविषयी सांगितलं आहे. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिनं हे गिफ्ट हॅम्पर सगळ्यांसोबक शेअर केलं आहे. त्यासोबत हा व्हिडीओ शेअर करत तिनं सांगितलं आहे की हे हॅम्पर तिला राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालं आहे. त्यासोबत तिनं त्यांचे आभार मानले आहे. खरंतर आभार मानत अमृतानं राजसाहेब ठाकरे, शालिनी वहिनी, मिताली आणि अमित ठाकरे...असं कॅप्शन दिलं आहे. 

mns leader Raj Thackeray gave diwali gift to Amruta Khanvilkar actress shares video

'नच बलिये 7' चं विजेतपद मिळवताच घेतली होती राज ठाकरेंची भेट

अमृता आणि तिचा पती हिमांशू हे दोघे ही 'नच बलिये 7' मध्ये दिसले होते. त्यावेळी ते फक्त स्पर्धक नाही तर त्याचे विजेते देखील ठरले होते. ते दोघे विजेत ठरल्यानंतर अमृतानं पती हिमांशू आणि आईसोबत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आणि संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती.

फक्त राज ठाकरे यांच्याकडून नाही तर एकनाथ शिंदे यांनी देखील दिली भेट

फक्त राज ठाकरे यांनीच नाही तर गणेशोत्सवा निमित्तानं वर्षा बंगल्यावर सगळ्या कलाकारांना वर्षा बंगल्यावर जाण्याची संधी दिलेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कलाकारांना दिवाळीनिमित्तानं खास भेटवस्तू पाठवल्या आहेत. त्याचा व्हिडीओ चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडेनं त्या भेटीचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यासोबत तिनं त्यांचे आभार देखील मानले आहेत. 

हेही वाचा : वर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?

दरम्यान, अमृताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'चंद्रमुखी' हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. आता अमृता ही 'कलावती' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमृताशिवाय संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजीत चव्हाण, हरिश दुधाणे, ओंकार भोजने, दिप्ती धोतरे, संजय शेजवळ आणि नील साळेकर हे कलाकार दिसणार आहेत.