..म्हणून मिताली राज पुन्हा ट्विटरवर झाली ट्रेंड

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे. 

Updated: Sep 26, 2017, 03:50 PM IST
..म्हणून मिताली राज पुन्हा ट्विटरवर झाली ट्रेंड  title=

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे. मात्र या वेळेस तिच्या खेळामुळे नव्हे तर नीता अंबानी, शाहरूख खान यांच्यासोबत फोटोशूट करायला मिळालेल्या संधीमुळे मिताली चर्चेत आली आहे. 
'व्होग' या प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजवर मिताली राज शाहरूख आणि नीता अंबानींसोबत झळकली आहे.  'व्होग वूमन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा नुकताच रंगला. या सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सनी सहभाग घेतला होता. 

 

Thrilled to be on Vogue cover with shahrukh khan and neeta ambani for 10th anniversary issue. Thank you @vogueindia for this glamourous moment off the field..

A post shared by Mithali Raj (@mithaliraj) on

शाहरूख खान 'व्होग एंटरटेनर ऑफ द डेकेट',ऐश्वर्या राय बच्चन 'व्होग इन्फ्लुएन्सर ऑफ द इयर' , करण जोहर 'व्होग मॅन ऑफ द इयर', ट्विंकल खन्ना 'व्होग ओपिनियन ऑफ द इयर', सोनम कपूर 'व्होग आणि IWC फॅशन आयकॉन ऑफ द इयर' या अवॉर्डने सम्मानित करण्यात करण्यात आले.  
यंदाच्या महिला विश्व क्रिकेट कप २०१७ मध्ये भारतीय महिला संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचला. तोडीस तोड खेळही रंगला. पण विश्वविजेता होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. या खेळातील मिताली राज तसेच इतर खेळाडूंचे विशेष कौतुक झाले होते.