'या' अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार 'मिस वर्ल्ड' मानुषी

अखेर मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज 

Updated: May 8, 2019, 10:09 AM IST
'या' अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार 'मिस वर्ल्ड' मानुषी title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : साऱ्या विश्वात भारताचं प्रतिनिधीत्व करत मिस वर्ल्ड या सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी मानुषी छिल्लर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण कोणतं फोटोशूट किंवा तिची एखादी सोशल मीडिया पोस्ट नसून, करिअरला मिळालेलं एक महत्त्वाचं वळण आहे. मॉडेलिंग विश्वात प्रसिद्धीझोतात आलेली आणि मिस वर्ल्डचा खिताब मिळवणारी मानुषी अखेर हिंदी कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कलाविश्वात याविषयीची माहितीही चर्चेत आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानुषी येत्या काळात एका बायोपिकमधून रुपेरी पडद्यावर दणक्यात पदार्पण करणार आहे. ऐतिहासिक कालखंडातील काही उल्लेख योद्ध्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर बेतलेलं कथानक या चित्रपटातून साकारण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मानुषी खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अक्षय कुमार के साथ बॉलीवुड डेब्यू करेंगी मानुषी छिल्लर, इस राजकुमारी के रोल में आएंगी नजर

अक्षय कुमारसोबत पदार्पणाच्याच चित्रपटात झळकण्याची संधी मिळाल्याच मानुषीसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत, तर यशराज फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून करण्यात येणार आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारलेल्या या चित्रपटातून मानुषी राजकुमारी संयुक्ता ही भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिचं हे रुप पाहणंही चाहत्यांच्यासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. गेल्या काही काळापासून मानुषी अभिनय कार्यशाळांना हजेरी लावत आहे, त्याशिवाय ती नृत्याचंही प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे तिची ही एकंदर तयारी पाहता कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी मानुषी तिच्या परिने सर्व गोष्टी शिकण्याला प्राधान्य देत असल्याचं स्पष्ट होत आहे.