मिलींद सोमणची पत्नी देतेय गंभीर आजाराशी झुंज

बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Updated: Dec 23, 2021, 02:56 PM IST
मिलींद सोमणची पत्नी देतेय गंभीर आजाराशी झुंज title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकवेळा त्याची पत्नी अंकिता कोंवरही त्याच्यासोबत व्यायाम करताना दिसते. मात्र, यावेळी अंकिताने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा खुलासा करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. अंकिता म्हणाली की, ती डिप्रेशनसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे.

अंकिताने  शेअर केला फोटो 
अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने  तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. प्रत्यक्षात तिच्यासोबत सगळं काही ठीक नाही. असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ती या फोटोत हसताना दिसत आहे. या फोटोमध्ये अंकिताच्या हातात ज्यूसचा ग्लास दिसत असून तिच्याजवळच्या टेबलावर काही फळं ठेवलेली आहेत. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर एक गोंडस हास्य पाहायला मिळत आहे. 

प्रत्येक चांगला दिसणारा माणूस चांगला नसतो, अंकिता
या फोटोसोबत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'अलिकडच्या दिवसातला फोटो. एक दिवशी माझ्या मनात वादळ आलं, पण चेहऱ्यावर हसू आणि शांतता होती.

होय, अजूनही काही दिवस आहेत जिथे सगळं काही ठीक नाही. प्रत्येक व्यक्ती जी चांगली दिसते ती खरोखर चांगली नसते. काही गोष्टी एकाचवेळी जड आणि निरर्थक वाटतात, पण आता मला पूर्वीसारखी भीती वाटत नाही.

मी पूर्वीपेक्षा मजबूत झाले आहे, अंकिता
अंकिताने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, 'चिंता आणि नैराश्यात दीर्घकाळ जगल्यानंतर, मला अजूनही त्या गडद स्पॉट्सच्या छोट्या क्षणांना सामोरं जावं लागत आहे. मी अंधाराच्या तोंडावर रडते, मी पूर्वीसारखं माझे विचार रोखू शकत नाही. पण आता मी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, अधिक सकारात्मक आहे आणि गडद पॅचमधून प्रकाश पाहण्याचा प्रयत्न करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे कोणासाठीही सोपं नाही, अंकिता
अंकिताने पुढे लिहिलं आहे की, 'या जगात टिकून राहण्यासाठी आपल्यापैकी काहींना बाकीच्यांपेक्षा थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. हे कोणासाठीही सोपं नाही, तुम्ही फक्त मजबूत आणि चांगले राहा.