मिलिंद सोमणचा पत्नीसोबत Under Water रोमान्स; Video तुफान व्हायरल

मिलिंद सोमननं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

Updated: Jul 28, 2022, 01:03 PM IST
मिलिंद सोमणचा पत्नीसोबत Under Water रोमान्स; Video तुफान व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमन (Milind Soman) अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. वयाच्या 56 व्या वर्षी तो फिटनेसच्या बाबतीत तरुणांना देखील टक्कर देतो. प्रोफेशनल लाईफसोबतच मिलिंद त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. अनेकदा तो पत्नी अंकिता कोंवरसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. अलीकडेच, मिलिंदनं एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही पाण्याखाली एकमेकांवर प्रेम व्यक्त करत आहेत.

मिलिंदसोबत त्याची पत्नी अंकिता कोंवर देखील फिटनेस फ्रीक आहे. दोघंही फिटनेससाठी अनेक अॅक्टिव्हिटी करताना दिसतात. मिलिंदनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघंही स्कुबा डाइव्ह करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ कपल गोलं ठरतं आहे. व्हिडीओत दोघंही हातानं हार्ट शेप बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मिलिंदनं 'एकत्र खूप काही एक्सप्लोर करू असे कॅप्शन दिले' आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिलिंदनं शेअर केलेल्या या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणं सुरु आहे. मिलिंद आणि अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.मिलिंदच्या या व्हिडिओवर चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओवर जबरदस्त कमेंट्स करत आहेत. लोक त्यांच्या बाँडिंगचे कौतुक करत आहेत. लोक त्याला अमेझिंग म्हणत प्रेम व्यक्त करत आहेत. 

अंकिता मिलिंदपेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. या दोघांची जोडी सोशल मीडियावर पसंत केली जाते. वयाच्या या मोठ्या अंतरामुळे त्यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलही करण्यात आले, परंतु प्रत्येक वेळी दोघांनीही ट्रोलला चोख प्रत्युत्तर दिले. 2018 मध्ये दोघांनी मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले. मिलिंदने 2006 मध्ये मायलेन जंपनोईशी पहिले लग्न केले होते, दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अंकिताच्या आधी मिलिंदने मधु सप्रेला डेट केले आहे.