मिलिंद सोमणचा गर्लफ्रेन्डसोबतचा डान्स व्हीडीओ व्हायरल

हा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Apr 21, 2018, 08:35 PM IST

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमणचं लग्न त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान गर्लफ्रेन्ड अंकिता कोंवर सोबत होत आहे. या लग्नाचे व्हीडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. एका व्हीडीओत मिलिंद सोमण आणि त्यांची गर्लफ्रेन्ड अंकिता नाचत असताना दिसत आहेत. एका फोटोत मिलिंद सोमण आई उषा सोमन सोबत दिसत आहे. मिलिंद सोमण आणि अंकिता यांचे अनेक फोटो इन्स्टावर व्हायरल होत आहेत. 

डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मिलिंद आणि अंकिताचं लग्न पार पडल्याचं म्हटलं जात आहे, मात्र हे लग्न झाल्याबद्दल मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवरकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मात्र इन्स्टाग्रामवर येत असलेल्या फोटोंवरून मिलिंद सोमणचं लग्नसभारंभ सुरू असल्याचं दिसतंय.

मिलिंद सोमन हा मॉडेल म्हणून एका जाहिरातीतून नावारूपास आला, मधू सप्रेसोबतच्या वादग्रस्त फोटोनंतर मिलिंद सोमन प्रसिद्धीस आला.