लग्नाचं आमंत्रण नसताना थेट मंडपात पोहोचाला मिका सिंग, नंतर घडलं असं की..

त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या मुलीला मीका सिंग म्हणाला....  

Updated: Jan 10, 2022, 11:40 AM IST
लग्नाचं आमंत्रण नसताना थेट मंडपात पोहोचाला मिका सिंग, नंतर घडलं असं की..  title=

मुंबई : बॉलिवूड गाण्यांशिवाय लग्नाचे कार्यक्रम अपुर्ण आहेत. आपण हळदी, लग्नात डीजे किंवा इतर म्यूझिक सिस्टमची व्यवस्था करतो. पण आमंत्रण नसताना लग्नात एक प्रसिद्ध गायक आला तर सर्वांना आनंद होईल. एका लग्नात प्रसिद्ध गायक मीका सिंग (Mika Singh) आमंत्रण नसताना पोहोचला. 

मंडपात एन्ट्री केल्यानंतर मीका सिंग फक्त वधू-वराला शुभेच्छा देवून निघून गेला नाही तर, त्याने गाणं देखील गायिलं. त्याने 'सावन में लग गई आग' हे गाणं गायिलं. लग्नात मिका सिंगला पाहून पाहुणे अचानक आश्चर्यचकित झाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर मिका सिंग शेजारी उभ्या असलेल्या गायिकेचं कौतुक केलं.तो म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. मी हिला 'सारे ग म प पर'मध्ये भेटलो. आता मला वाटलं की हिला भेटू.... म्हणून आलो... सध्या मीकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

'सावन में लग गई आग' हे मिका सिंगच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.  1998 मध्ये प्रदर्शित झालेलं हे गाणं मिकाने 2008 मध्ये रिक्रिएट केलं. 'इंदू की जवानी' या चित्रपटात हे गाणं नवीन व्हर्जनमध्ये झळकलं.