#METOO चा धसका, केआरकेनं कार्यालयातल्या महिलांना कामावरून काढलं

मीटू मोहिमेचा धक्का बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना बसला.

Updated: Oct 30, 2018, 10:51 PM IST
#METOO चा धसका, केआरकेनं कार्यालयातल्या महिलांना कामावरून काढलं title=

मुंबई : मीटू मोहिमेचा धक्का बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना बसला. चित्रपट समिक्षक आणि निर्माता राशिद खान उर्फ केआरकेनं या मोहिमेचा धसका घेतला आहे. केआरकेनं त्याच्या मुंबई आणि दुबईतल्या कार्यालयातल्या महिलांना कामावरून काढून टाकलं आहे. ट्विटरवरू केआरकेनं ही माहिती दिली आहे. पत्नीनं सांगितल्यामुळे आपण महिलांना कामावरून काढून टाकल्याचं केआरके म्हणालाय.

हो मी बायकोचा गुलाम आहे, हे १०० टक्के खरं आहे. त्यामुळे तिचा आदेश मला मानावा लागला. आता माझ्या मुंबई आणि दुबईतल्या कार्यालयात एकही महिला कर्मचारी नाही. आता कोणत्या मुलीशी बोलणंही होणार नाही आणि पार्टीही नाही. धन्यवाद, असं ट्विट केआरकेनं केलं आहे.

#MeToo: कमाल खान ने अपने ऑफिस से सभी महिलाओं को निकाला, कहा- पत्नी के ऑर्डर पर ऐसा किया

वादग्रस्त ट्विटमुळे केआरके नेहमीच चर्चेत असतो. केआरके स्वत:ला बॉलीवूड चित्रपटांचा समिक्षक मानतो. बॉक्स ऑफिसवर सगळी रेकॉर्ड मोडणाऱ्या बाहुबलीवरही केआरकेनं टीका केली होती. पोस्टर बॉयज आणि जुडवा-२ या चित्रपटांवरही केआरकेनं निशाणा साधला होता.

मागच्या वर्षी केआरकेनं सिक्रेट सुपरस्टारच्या क्लायमॅक्सचा खुलासा केला होता. यानंतर केआरकेचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं होतं. ट्विटर अकाऊंट सुरू केलं नाही तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी केआरकेनं दिली होती.

केआरकेनं निर्माता म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं देशद्रोही आणि एक विलन फिल्म या चित्रपटात कामही केलं आहे. बिग बॉस ३मध्ये केआरके स्पर्धक होता.