Meenakshi Seshadri Rajkumar Santoshi : बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रि ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. मीनाषीनं अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार संतोषी यांचा 'दामिनी' होता. या चित्रपटाची शूटिंग सुरु होती तेव्हा तिला खूप वाईट अनुभव आला होता. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की राजकुमार संतोषी यांच्या रोमॅन्टिक प्रपोजल आणि लग्नाच्या प्रपोजलला नकार दिल्यानंतर तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तिनं सांगितलं की ती इतके दिवस चूर राहिली आणि अखेर निर्माते गिल्ड यांच्या समर्थनामुळे तिला पुन्हा चित्रपटात घेण्यात आलं.
मीनाक्षी शेषाद्रिनं 'झूम'ला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मीनाक्षी म्हणाली की, 'राजकुमार संतोषीजी आणि मी याविषयी न बोलण्याचं निर्णय घेतला होता. आता ही गोष्ट जुनी झाली आहे. पण हिंम्मतीनं उभ राहणं गरजेचं आहे. आता तुमची गरज नाही हे कोणी कोणाला सांगायला नको. मी गप्प राहून या गोष्टीला सहन केलं. मी फक्त इतकंच सांगितलं की मला यावर कमेंट करायची नाही, कारण त्या गोष्टीला वादाच रुपांतर देणं हे माझ्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. हे कोणतंही भांडण नाही.'
पुढे मीनाक्षी म्हणाली, 'मी ज्या गोष्टीवर विश्वास करते, त्यासाठी मी ठाम असते आणि जर काही गोष्टी ठीक होणार होत्या तर आम्ही एक टीमच्या रुपात मिळून काम करण गरजेचं होतं. हा एक संदेश आम्हाला चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांना द्यायचा आहे. मी एक उत्तम चित्रपट बनवण्यासाठी तिथे होती आणि दामिनी निश्चितपणे तसाच चित्रपट होता.'
पुढे मीनाक्षीनं सांगितलं की तिला 'दामिनी' या चित्रपटाची ऑफर मिळाली होती पण तिला त्यातून अचानक काढून टाकण्यात आलं. कारण तिनं राजकुमार संतोषी यांच्या लग्नाच्या प्रपोजलला नकार दिला. मीनाक्षीनं खुलासा केला की त्यानंतर ती निर्माते गिल्ड यांच्याकडे या सगळ्यात पाठिंबा मिळावा म्हणून गेली होती. त्यानंतर तिला हा चित्रपट परत मिळाला.
मीनाक्षीनं सांगितलं की कशा प्रकारे निर्माते गिल्डनं यांनी समर्थन केलं. 'मी चित्रपटाशी संबंधीत असलेल्या सगळ्या लोकांचा सन्मान करते. विशेषत: संतोषी जी, कारण त्यांची दृष्टी खूप चांगली होती. शेवटी, ते म्हणतात की कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते, म्हणून प्रोड्यूसर्स गिल्ड, आर्टिस्ट गिल्ड, सर्वांनी मिळून हे शक्य केले.'
हेही वाचा : 'तिच्यासोबत केमिस्ट्री निव्वळ अशक्य', 'या' अभिनेत्रीसोबत काम करण्यास विजय सेतुपतीचा स्पष्ट नकार!
मीनाक्षीनं 1995 मध्ये हरीश मैसूर यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. राजकुमार संतोषी यांना देखील दुसरीकडे प्रेम मिळालं. त्यांनी मनीलाशी लग्न केलं आणि त्यांना राम आणि तनिषा नावाची मुलं आहेत. मीनाक्षी आणि राजकुमार संतोषी यांचा पहिला चित्रपट 'एक साथ घायल' होता. 'दामिनी'नंतर त्यांनी 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घातक' चित्रपटात एकत्र काम केलं.