राधिकााला अंधारात ठेवून गुरूचा शनायासोबत साखरपुडा ?

राधिका हा धक्का कसा पचवेल? 

राधिकााला अंधारात ठेवून गुरूचा शनायासोबत साखरपुडा ? title=

मुंबई : ‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण!

गुरुनाथ जरी राधिका आणि बाकीच्या लोकांना शनायासोबत त्याचं ब्रेकअप झाल्याचं खोटं भासवत असला तरी सगळ्यांच्या नकळत ते दोघंही त्यांच्या साखरपुड्याच्या तयारीत आहेत. एकीकडे महाजनी काका गुरुवरील त्यांच्या संशयामुळे त्याच्यावर आणि शनायावर बारीक नजर ठेवून आहेत तर दुसरीकडे शनाया, गुरु आणि इशा हे गुरु आणि शानयाच्या फोटोशूट बद्दल प्लॅनिंग करत आहेत. ही माहिती महाजनी काकांना लागते आणि त्यामुळे त्यांचा पाठलाग करायचं ठरवतात.

सासूबाईंच्या इच्छेखातर राधिका गुरुसोबत जबरदस्ती नवस फेडण्यासाठी गणपतीचे दर्शन घ्यायला जाते पण तिथेही तिला गुरुचे हावभाव संशयास्पद वाटतात, गुरुनाथ आपल्यापासून काही तरी लपवत असल्याची भावना राधिकाला सलतेय. राधिका गुरुसाठी स्वतःच्या मनाविरुद्ध वटसावित्रीचा व्रत करतेय पण तिकडे गुरु त्याच्या आणि शानयाच्या साखरपुड्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. राधिकाला शनाया आणि गुरूच्या साखरपुढ्याबद्दल कळेल का? राधिकेच्या नकळत शनाया आणि गुरु साखरपुडा करण्यात यशस्वी ठरतील का? राधिका त्यांचा साखरपुडा उधळून लावेल का? हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.