...म्हणून सोशल मीडियावर मराठी कलाकार बोलत आहेत 'फ' ची बाराखडी

सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियावर 'फ' ची बाराखडी म्हणत एक व्हिडिओ पोस्ट करत आहे.

Updated: Sep 5, 2017, 12:02 PM IST
...म्हणून सोशल मीडियावर मराठी कलाकार बोलत आहेत 'फ' ची बाराखडी title=

मुंबई : सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियावर 'फ' ची बाराखडी म्हणत एक व्हिडिओ पोस्ट करत आहे.

'तो येतोय धुमाकूळ घालयला' म्हणत तुमच्या आमच्या मनात उत्सुकता निर्माण करणारा हा प्रयत्न म्हणजे एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा आहे. 'फ' च्या बाराखडीमध्येच या चित्रपटाच्या नावाचा संकेत दडला आहे. 

  चिमुकल्या कबीर गोडबोले पासून मिथिला पालकर, निपुण धर्माधिकारी ते अगदी अमृता खानविलकरपर्यंत अनेकांनी त्यांच्या खास अंदाजामध्ये 'फास्टर फेणे' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेतला आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'फास्टर फेणे' या चित्रपटात अमेय वाघ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

 'मुरांबा', 'अमर फोटो स्टुडिओ' याप्रमाणेच अमेय वाघ याच्या 'फास्टर फेणे' या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरूवातही सोशल मीडियातून झाली आहे. हटके पण प्रभावी सोशल कॅम्पेन्समधून तरूण चाहत्यांना कलाकृतींपर्यत अलगद खेचून आणण्याचा अमेयचा हा तिसरा प्रयत्नही यशस्वी ठरणार असे दिसत आहे. 

 झी स्टुडिओसोबत, मुंबई फिल्म कंपनी 'फास्टर फेणे ' या चित्रपटाचे निर्माते आहे.रितेश देशमुखने या चित्रपटाची घोषणा त्याच्या ट्विटर अकाऊंटवर केली आहे. २७ ऑक्टोबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. फास्टर फेणे’ हे प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी जिवंत केलेलं एक लोकप्रिय पात्र. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजलेलं. बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं.