विशाखा सुभेदारचं घर सांभाळणाऱ्या ताईंनी घेतलं 2 bhk घर, म्हणाली '14 वर्षांपूर्वी स्लम एरियात राहणारी...'

 विशाखाचे घर सांभाळणाऱ्या ताईंनी नुकतंच 2 बीएचकेचं घर बुक केलं आहे. याबद्दल विशाखाने त्यांचं कौतुक केले आहे. 

Updated: Feb 29, 2024, 09:10 PM IST
विशाखा सुभेदारचं घर सांभाळणाऱ्या ताईंनी घेतलं 2 bhk घर, म्हणाली '14 वर्षांपूर्वी स्लम एरियात राहणारी...' title=

विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. या कार्यक्रमामुळे विशाखा सुभेदार लोकप्रिय झाली आहे. सध्या त्या 'शुभविवाह' या मालिकेत झळकत आहे. सध्या विशाखा सुभेदार या एका पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. 

विशाखा सुभेदार या इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्याबरोबर तिचं घर सांभाळणाऱ्या मावशी दिसत आहेत. विशाखाचे घर सांभाळणाऱ्या ताईंनी नुकतंच 2 बीएचकेचं घर बुक केलं आहे. याबद्दल विशाखाने त्यांचं कौतुक केले आहे. 

विशाखा सुभेदार यांची पोस्ट

"आज सकाळी माझ्या अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा "शोभा "तिचा फोन आला.. ताई good news आहे, (मला वाटलं पोराचा लग्नाची तारीख काढली असावी..!) मी म्हटलं "काय गं??" तर म्हणली ताई... घर book केल 2 bhk.. खुप आनंद, उत्साहात सांगत होती.. मलाही खुप आनंद झाला.. अंबरनाथ west ला थोडं स्लम एरिया मध्ये रहाणारी, चौदा वर्षपूर्वी शोभा माझयाकडे जवळ जवळ रोज 40 मिनिट चालत कामाला यायची, तिची धावपळ आणि पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घरा जवळ मी भाडयाने घर घेऊन दिल, तर वाचलेल्या वेळेत तीने अजून एक ठिकाणी काम धरलं, पोरं मोठी झाली, शिक्षण झाली...

एकदा फ्रीज घायचा म्हणाली पगारातून एक हजार कापा, तुम्ही घेऊन दया फ्रिज.. आणी तीने फेडले पैसे.. धाडसी बाई..! तिच्या मुलांनी सुद्धा खुप कष्ट केले...10/12 वी नंतर कुठे कुठे छोटयामोठ्या नोकऱ्या केल्या, घराला हातभार लावला, मग मोठा मुलगा उत्तम पगाराने कामाला लागला.. पुन्हा शोभा चा फोन.. ताई शुभम ला इतक्याइतक्या पगाराची नोकरीं लागली...! पुन्हा फोन ताई लग्न ठरलं...! पुन्हा फोन..धाकटी पोर पास झाली..! तिची तिची अनेक शिखर तीने ओलांडली.. आज तिचा प्रवास पहिला कीं मलाच खुप समाधान मिळत .! तिच्या सगळ्या प्रवासाची मी साथीदार व साक्षीदार आहे..! माझ्या कडे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली कीं कोण कौतुक वाटत मला...! मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर..! 

माझ्याकडे स्पॉटबॉय म्हणून आलेला" शिवा" त्याला मी क्लासला लावले, ड्रायविंग शिकवलं आणि त्याचा ड्राइव्हर झाल्यावर,त्याला उत्तम पगाराची नोकरीं सुद्धा लागली.. अर्थात त्याचे कष्ट आहेतच, पण मी फक्त एक मार्ग झाले ह्याचा मला आंनद होतों कायमच..! परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्या कडून ते करवून घेतलं हे त्या ईश्वराचे आभार..माझ्या शोभाचे खुप कौतुक", अशी पोस्ट विशाखा सुभेदार यांनी केली आहे. 

विशाखा सुभेदार यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, विशाखा सुभेदार सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत झळकत आहेत. यात त्या रागिणी हे खलनायिकेचे पात्र साकारताना दिसत आहे. यापूर्वी विशाखा ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. तिने या व्यतिरिक्त अनेक चित्रपटात काम देखील केलं आहे.