तब्बल 51 वर्षांनी वंदना गुप्तेंनी शेअर केला लग्नाचा फोटो, म्हणाल्या 'माझा विश्वासच...'

वंदना गुप्ते या गेल्यावर्षी लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्या होत्या. त्याचा व्हिडीओही समोर आला होता. 

Updated: Feb 21, 2024, 09:57 PM IST
तब्बल 51 वर्षांनी वंदना गुप्तेंनी शेअर केला लग्नाचा फोटो, म्हणाल्या 'माझा विश्वासच...' title=

Vandana Gupte Marriage Photos : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. या चित्रपटाला महिला वर्गांचा जास्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी शशी हे पात्र साकारले होते. वंदना गुप्ते यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक पाहायला मिळाले. या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या वंदना गुप्ते यांनी तब्बल 51 वर्षांनी त्यांच्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. 

वंदना गुप्तेंनी शेअर केला लग्नातील फोटो

वंदना गुप्ते या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वंदना गुप्ते यांनी दोन फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिला फोटो हा त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा असल्याचे दिसत आहेत. यात वंदना गुप्ते यांचे पती शिरीष गुप्ते यांनी ब्लेझर, शर्ट, टाय असा लूक केला आहे. तर वंदना गुप्ते यांनी साडी नेसली असून त्याबरोबर काही दागिनेही परिधान केले आहे. या लूकमध्ये ते दोघेही फारच सुंदर दिसत आहेत. तर दुसरा फोटो हा वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांचा सध्याच्या काळातील आहे. यात त्या झोक्यावर बसून शिरीष यांच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. त्यांनी या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

पतीचे मानले आभार

"आज आमच्या लग्नाचा 51 वा वाढदिवस आहे. आम्ही इतकी वर्षे एकत्र घालवली यावर माझा विश्वासच बसत नाही. मी मनोरंजन विश्वातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण झाली. या संपूर्ण कारकिर्दीत शिरीषने मला कायम पाठिंबा दिला. तो कायमच माझ्या पाठिशी उभा राहिला. एक गृहिणी म्हणून घर चालवणं आणि त्याचबरोबर अभिनेत्री म्हणून अभिनय करणं यात माझी कसरत व्हायची. पण शिरीष तुझे खूप खूप आभार सर्वच गोष्टींसाठी...", असे वंदना गुप्ते यांनी म्हटले आहे.

दरम्यान वंदना गुप्ते या गेल्यावर्षी लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्या होत्या. वंदना गुप्ते व शिरीष गुप्ते यांनी कुटुंबाच्या साक्षीने पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला होता. यात वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते हे मराठमोळ्या रुपात दिसत होते. त्यावेळी त्यांनी मुंडावळ्याही बांधल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.