प्रिया बापट लवकरच होणार आई?

हा व्हिडिओ समोर येताच उमेश आणि प्रिया गुड न्यूज देत असल्याचं बोललं जाऊ लागलं.

Updated: Aug 20, 2021, 10:27 AM IST
प्रिया बापट लवकरच होणार आई? title=

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट तिच्या फिट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणारी प्रिया बापट काही ना काही नवं चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

त्यात प्रियाने एक गोड बातमी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रियाचा एक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहे. ज्यात तिने हॉस्पिटलमध्ये पेशेंटला दिला जाणारा पोशाख घातला आहे, आणि तिचं बेबी बंम्ब यात दिसून येत आहे.  व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

फोटो समोर येताच उमेश आणि प्रिया गुड न्यूज देत असल्याचं बोललं जाऊ लागलं. लवकरच प्रिया बाळाला जन्म देणार अशी ही चर्चा सुरु झाली. 

पण व्हिडिओ आणि समोर आलेले फोटो हे प्रियाच्या सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसिरीजच्या सेटवरील आहे. या वेबसिरिजमध्ये ती प्रेग्नेंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यासाठी ती या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

उमेश आणि प्रिया ही मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात.