We Are Engaged... म्हणतं अभिनेत्री पूजा सावतंने शेअर केला तो 'खास' फोटो

Pooja Sawant Engaged : मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री पूजा सावंत मिस्ट्री बॉयसोबत चर्चेत आली आहे. शेअर केले खास फोटो... कोण आहे पूजा सावंतचा जोडीदार?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 28, 2023, 11:27 AM IST
We Are Engaged... म्हणतं अभिनेत्री पूजा सावतंने शेअर केला तो 'खास' फोटो  title=

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत चर्चेत आली आहे ते तिच्या Engaged झालेल्या पोस्टमुळे. पूजाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती एका मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे. पूजा सावंत ही गोड अभिनेत्री आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत दिसत आहे. सध्या ही व्यक्ती यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. असं असताना मराठमोळ्या अनेक कलाकारांनी या फोटोखाली शुभेच्छा देणाऱ्या कमेंट केल्या आहेत. 

पोस्टमध्ये काय म्हणाली पूजा 

अगदी मनापासून माझ्या आयुष्याचं नव पर्व खास व्यक्तीसोबत... 
ही प्रेमाची जादू मी नवीन प्रवासात अनुभवत आहे.. असेच आमच्यासोबत राहा... 
We Are Engaged आणि हार्ट अशी पोस्ट पूजाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 

पूजाची पोस्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजा सावतं कधी लग्न करणार? कुणासोबत करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडायचा. पण अखेर पूजा सावंतच्या या पोस्टने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पूजा सावंतने तीन फोटो सोशल मीडियावर पोश्ट केले आहेत. मात्र यामध्ये मिस्ट्री बॉयचा चेहरा अद्याप स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे तर्क वितर्क लावले जात आहेत? पूजाचा जोडीदार कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

लग्नासाठी हवा होता असा मुलगा

एका मुलाखतीत पूजा सावंतने आपल्याला लग्नासाठी कसा नवरा हवाय? याबाबत वक्तव्य केलं होतं. एवढंच नव्हे तर आपल्याला लग्न करायचं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं होतं. आयुष्यात स्थिरता हवी असून लग्न करून छान संसार करायचा असल्याचं सांगितलं होतं. 

पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. प्राणी प्रेमी म्हणूनही तिची ओळख आहे.  तिनं बऱ्याच चित्रपटांत काम केलं आहे. मात्र, तिची ‘लपाछपी’ चित्रपटातील भूमिका विशेष गाजली. तिला या चित्रपटासाठी ‘उत्कृष्ट अभिनेत्री’च्या पुरस्कारानंही गौरविण्यात आलं होतं.