पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

यंदाच्या वर्षी अनेक कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.   

Updated: Oct 15, 2020, 06:18 PM IST
पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना title=

मुंबई : यंदाच्या वर्षी अनेक कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यापैकी एक म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आशुतोष भाकरे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोषने आत्महत्या करत त्याचा जीवन प्रवास संपवला. आशुतोषने नांदेडमध्ये त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्यानंतर मयुरी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर तिने आता एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये देखील मयुरी तिच्या पती बद्दल बोलताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll) on

मयुरीने तिच्या खास मैत्रीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, तिच्या कठिण प्रसंगी धावून आल्याचा उल्लेख केला आहे. आशुतोषला अनेक दिवसांपासून नैराश्य आलं होतं. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचे उपचारही त्याच्यावर सुरू होते.  त्यांच्या या प्रवासात मयुरीच्या मैत्रीणीने केलेले प्रयत्न इत्यादी गोष्टी आठवत मयुरी या व्हिडिओद्वारे व्यक्त झाली आहे. 

दरम्यान, आशुतोषला मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. आशुतोष साडे चार वर्षांपासून मुंबईत राहत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात तो नांदेडला आपल्या आई-वडिलांकडे गेला.