'दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा...', जुई गडकरीची 'ती' पोस्ट चर्चेत

 तिच्या या स्टोरीची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. यात तिने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. 

Updated: Jan 10, 2024, 11:25 PM IST
'दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा...', जुई गडकरीची 'ती' पोस्ट चर्चेत title=

Jui Gadkari Post : मराठी मालिका विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ती पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरात पोहोचली. जुईने पुढचं पाऊल या मालिकेत कल्याणी हे पात्र साकारले होते. त्याबरोबरच तिने बिग बॉस मराठी या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. आता जुई गडकरी ही ‘ठरलं तर मग’ या मालिकेत झळकत आहे. नुकतंच जुईच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच मालिकेतील अपडेट देखील देत असते. नुकतंच जुईने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिच्या या स्टोरीची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. यात तिने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. 
आणखी वाचा : 'मी बायकोला फोन केला...', अंशुमन विचारेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम का सोडला? म्हणाला 'सतत तेच तेच...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Monika Dabade (@mostly_monika)

"दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा स्वत:च्या सुधारणेवर लक्ष दिलं तर खूप पॉझिटिव्ह चेंजेस होतात. त्यामुळे आपली एनर्जी कुठे लावायची हे नीट ठरवायला पाहिजे", असे जुई गडकरीने म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

jui gadkari post

आणखी वाचा : 'तुला मालिकेतून का काढले?' प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली...

दरम्यान जुई गडकरी हिने मध्यंतरी आजारपणामुळे कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा मालिकाविश्वात दमदार पुनरागमन केले. जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती सायली ही पात्र साकारत आहे. यात तिच्या पात्राचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे. सध्या ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.