मुंबई : पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच पुढचे सातही जन्म हाच पती मिळावा यासाठी राज्यात वटपोर्णिमेचा सण साजरा केला जातो.
मराठी अभिनेत्रींनीही मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. यावर्षी लग्नबंधनात अडकलेल्या अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपोर्णिमेचे व्रत केले.
तसेच याचे फोटोही त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम तसेच ट्विटरवरुन शेअर केले. अभिनेत्री स्पृहा जोशी, अक्षया गुरव, अपूर्वा नेमळेकर, मयुरी वाघ यांनी वटपोर्णिमा साजरी केल्याचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केलेत.
मला काहीच Problem नाही पण त्याला सात जन्मासाठी खूप Problem होणार आता #MKPN #28JULY pic.twitter.com/QBQX96bScU
— Spruha Joshi (@spruhashirish) June 8, 2017