'मंगळसूत्र विकलं पार्टटाइम नोकरी केलीस पण...', अभिनेत्याची आईसाठी भावूक पोस्ट

Sanket Korlekar Emotional Post for Mother : मराठमोळ्या अभिनेत्यानं आईसाठी शेअर केली भावूक पोस्ट... तिच्या कष्टाविषयी बोलताना म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: May 25, 2024, 01:13 PM IST
'मंगळसूत्र विकलं पार्टटाइम नोकरी केलीस पण...', अभिनेत्याची आईसाठी भावूक पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Sanket Korlekar Emotional Post for Mother : डॉ.बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता म्हणजे संकेत कोरलेकर. संकेत कोरलेकरला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. संकेत हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अशात आता संकेतनं त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

संकेतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. हा व्हिडीओ शेअर करत संकेतनं कॅप्शन दिलं की "आई आज तुझा वाढदिवस..गेल्या 10 वर्षात तुझ्यावरचं प्रेम 1000 पट झालंय. त्या आधी तुला मी देव समजेन इतके प्रेम नव्हते कारण तू केलेल्या त्यागाची किंमत कळण्या इतपत लायकी नव्हती माझी. मला नोकरी करायची नव्हती छोट्याश्या गावातून येऊन अभिनेता बनायचं होतं पण चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून स्ट्रगल करण्यासाठी माझा दुसरा छंद एडीटींग आणि रेकॉर्डिंग मधून पैसे कमवण्यासाठी तू मला न विचारता तुझं मंगळसूत्र विकलस आणि मला लॅपटॉप घेऊन दिलास."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे संकेत म्हणाला की "मुंबईत राहायला खायला पैसे नव्हते म्हणून भाड्याचा खोलीचे पैसे कमविण्यासाठी पप्पांसोबत तू पण दोन हजार पगाराची पार्ट टाइम नोकरी पकडलीस पण कधीच म्हणाली नाहीस की संकेत इतकी वर्ष झाली तुझं काहीच घडत नाहीये तू अभिनयाचा नाद सोड आणि परत ये गावला नोकरी कर म्हणून. मी रडत खडत का होईना पण युनिवर्स सोबत एकाच गोष्टीसाठी भांडत होतो की ***** आत्ता माझ्यासाठी नाही माझ्या आई साठी मला यशस्वी कर आणि आज आई वडिलांच्या आशीर्वादाने सगळं काही आहे. माझ्या फॅमिली शिवाय माझं जगणंच व्यर्थ आहे. आई.. तुझ्यावरचं हे प्रेम हा आदर मी मरेपर्यंत कायम असेल. माझ्या आईने माझ्यासाठी जे जे केलय ते मलाच माहित आहे. त्यामुळे आईसाठी.. काहीही करेन... काहीही. आई तू 100 वर्ष निरोगी आणि धडधाकट जग. वाढदिवसाच्या शुभेच्छा." 

हेही वाचा : 'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौन

संकेत हा अभिनयासोबत युट्यूबर देखील आहे. त्याचे युट्यूबवर 4 लाख सबस्क्रायबर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर 79.4K फॉलोवर्स आहेत.