Marathi Actor: पैसै कमवण्यासाठी 'हा' मराठमोळा अभिनेता चालवायचा रिक्षा

Pushkar Shrorti: पुष्कर श्रोत्री हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. सध्या त्याची एक इन्टाग्राम पोस्ट (Instagram Video) व्हायरल होत आहे ज्यात पुष्करनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Updated: Feb 16, 2023, 04:33 PM IST
Marathi Actor: पैसै कमवण्यासाठी 'हा' मराठमोळा अभिनेता चालवायचा रिक्षा title=

Pushkar Shrotri: आज मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी भरारी घेत आहे. त्याचपाठोपाठ मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आज मराठी किंवा हिंदीपुरतेच (Marathi Industry) मर्यादित राहिले नाहीत तर त्यांची ख्याती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. मराठी सिनेमाही आता भारतातच नाही तर इतर अनेक राज्यांमध्ये पाहिला जातो आणि फॉलो केला जातो. अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे अनेक फॅन्स आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत पुष्कर श्रोत्री हे अत्यंत लोकप्रिय नावं आहे. मराठी मालिका, नाटक, सुत्रसंचालन आणि सिनेमांतून पुष्कर श्रोत्रीनं (Pushkar Shrorti Instagram Post) अनेक नानाविध भुमिका केल्या आहेत. पुष्कर श्रोत्रीनं कॉलेजमध्ये असल्यापासून नानाविध एकांकिकांतून काम केली आहेत. पुष्कर सोशल मीडियावरही खूप एक्टिव आहे. 

नुकताच त्यानं सांगितलेला एक जुना किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. त्यात त्यानं म्हटलं आहे की, पैसे कमवण्यासाठी त्यानं रिक्षाही चालवली आहे. तेव्हा जाणून घेऊया की नक्की हा किस्सा आहे तरी काय? सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज हे व्हायरल होत असतात. पुष्कर सोशल मीडियावरूनही (Social Media Viral Post) आपल्या प्रेक्षकांना अपडेट करत असतो. नुकताच त्यानं इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो आणि संदीप पाठक 'पटलं तर घ्या विथ जयंती' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सध्या या शोचा एका प्रोमो व्हायरल झाला आहे. 

या शोमध्ये अभिनेता संदीप पाठक आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री एकत्र हसताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. त्याचसोबत मध्ये गंभीरही होताना दिसत आहेत. परंतु हा शो अद्याप प्रेक्षंकाच्या भेटीला आलेला नाही. हा एपिसोड लवकरच 17 फेब्रुवारी म्हणजे उद्या प्रदर्शित होईल. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होताना दिसत आहेत. 

काय म्हणाले संदीप आणि पुष्कर? 

यावेळी त्या दोघांना असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्यात पुष्कर श्रोत्री म्हणतो की तो फावल्या वेळात रिक्षा चालवायचा आणि पैसे कमवायाचा. परंतु नक्की तो का बरं असं करायचा याचा खुलासा तुम्हाला उद्याच्या भागातच पाहायला मिळेल. आपल्या देशातील आजचं, उद्याचं आणि कालचं राजकारण हे पाणी देऊ, वीज देऊ आणि रस्ते देऊ याभोवतीच फिरणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यातून आपण कधी बाहेर पडणार असं संदीप पाठक म्हणतो. सध्या हा व्हिडीओ त्यांच्या प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचसोबतच ते दोघंही राजकीय आणि सामजिक मुद्द्यांवरही बोलताना दिसत आहेत. त्यामुळे उद्याचा भाग हा त्यांच्या प्रेक्षकांसाठी पर्वणीचाच ठरणार आहे.