चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्याला गंभीर दुखापत

Marathi Actor Got Injured : मराठी अभिनेत्याला चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, गंभीर दुखापत...

दिक्षा पाटील | Updated: Jul 14, 2024, 02:35 PM IST
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्याला गंभीर दुखापत title=
(Photo Credit : Social Media)

Marathi Actor Got Injured : मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं सगळीकडे जोरदार प्रमोशन सुरु आहे. आगरी- कोळी समाजातील भाषेचा झणझणीत जलवा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, चित्रपटात 'बाबू'ची भूमिका साकारणारा अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी पारंपरिक पेहरावात नुकतंच आपल्या कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला नवी मुंबईतील दिवाळे गावातील मासे मार्केटमध्ये गेले होते. 

यावेळी त्यांच्यासोबत निर्माते बाबू कृष्णा भोईरही होते. यावेळी चित्रपटातील टायटल गाण्यावर डान्स करताना धारदार कोयता लागून अंकितच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशातही तो नाचत होता, परंतु हातातून रक्त वाहू लागल्यानं सगळं कोळी बांधव लगेच त्याच्या मदतीला धावून आले. गंभीर दुखापत झाल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. तर तिथे गेल्यानंतर अंकितच्या हाताला नऊ टाके पडले आहेत. उपचारानंतर अंकित आपल्या कोळी बांधवाना भेटण्यास आणि त्यांचे आभार मानण्यास पुन्हा त्या मार्केटमध्ये गेला. या सगळ्यांचे प्रेम बघून अंकित भारावून गेला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

घटनेबद्दल अंकित म्हणाला, "कोळी बांधवांबद्दल मला आदर आहेच, परंतु आज त्यांच्यातील माणुसकी, आत्मीयता पाहून हा आदर अधिकच वाढला आहे. मला दुखापत झाल्यानंतर हे सगळं ज्या पद्धतीनं माझ्या मदतीला धावून आले, हे पाहून मी खूपच भारावलो. या सगळ्या गोंधळात आमची चर्चा अर्धीच राहिली मुळात त्यांच्याकडून जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणूनच उपचारानंतर मी या माझ्या बांधवाना भेटायला परत आलो. या निमित्तानं यांच्याप्रती असलेली कृतज्ञता मला व्यक्त करता आली. जशी आपुलकी त्यांनी या क्षणी माझ्याबद्दल दाखवली तसेच प्रेम 'बाबू'वरही करा.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : 81 वर्षांच्या अमिताभ यांच्या पाया पडण्यासाठी रजनीकांत वाकले अन्..., अंबानींच्या लग्न सोहळ्यातील VIDEO VIRAL

'बाबू' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहनसोबत या चित्रपटात नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत.