'प्रदीप रावांचे नाव घेते...' पतीसाठी घेतला मानसीने उखाणा

१९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केलं.   

Updated: Feb 6, 2021, 07:55 PM IST
'प्रदीप रावांचे नाव घेते...' पतीसाठी घेतला मानसीने उखाणा title=

मुंबई : 'बाई वाड्यावर या...' गाण्यावर ठेका धरत मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मानसीने नुकताच बॉक्सर प्रदिप खरेरासोबत सात जन्माची गाठ बांधली. मानसी पती प्रदीपसोबत कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिने तिच्या लग्नातील काही भावूक क्षण देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानसीने शेअर केलेले फोटो आणि  व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय  चाहत्यांनी देखील तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

तर दुसरीकडे लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडल्या नंतर नवरा-नवरीला घ्यावा लागतो उखाणा. तर लग्नानंतर मानसीने देखील तिच्या पतीसाठी उखाणा घेतला आहे. मानसीने निळ्या रंगाची साडी नेसली असून अतिशय सुंदर अंदाजात तिने उखाणा घेतला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये पती प्रदीपसाठी उखाणा घेतला आहे. ‘मंदिरात वाहते फुल आणि पान, प्रदीप रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान’ असा उखाणा घेत मानसीने सर्वांचे मन जिंकले आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. 

सांगायचं झालं तर मानसीचा पती प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून प्रदीप आणि मानसीच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखपुडा झाल्याचं जाहीर केलं. अखेर १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केलं.