'माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम...', 12 सेलिब्रिटींसोबत अफेअर असूनाही Manisha Koirala आज एकटीच

'पुन्हा एकदा एखाद्या चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा....', प्रेम प्रकरणात Manisha Koirala ने केलाय कटू प्रसंगांचा सामना  

Updated: Dec 7, 2022, 03:36 PM IST
'माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम...', 12 सेलिब्रिटींसोबत अफेअर असूनाही Manisha Koirala आज एकटीच title=

Manisha Koirala love life : 'मन', 'दिल से..', 'इंडियन', 'संजू',  'महाराजा'  अशा एकापेक्षा एक सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) आज रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.. झगमगत्या विश्वात रोज अनेक नात्यांची नव्याने सुरुवात होते, तर काही नाती मात्र कायमची तुटतात. तर सेलिब्रिटींच्या आयुष्यात खऱ्या आणि दिर्घ काळ टिकणाऱ्या प्रेमाची एन्ट्रीच होत नाही. (manisha koirala life)

एक काळ बॉलिवूडमध्या अव्वल स्थानी असलेली अभिनेत्रीच्या आयुष्यात 12 पुरूषांची एन्ट्री झाली, पण तिच्या नशिवात प्रेमच नव्हत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनीषा कोइराला आहे.आज जीवनात सर्व काही असूनही मनिषा एकटी आयुष्य जगते. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्रीने 'मी सत्य स्वीकारलंय! माझ्या नशिबातच प्रेम नाही...' असा खुलासा केला.  (manisha koirala songs)

'बहुतेक माझ्या नशिबात स्त्री, पुरूषाचे प्रेमच नाही. ठिक आहे. पुन्हा एकदा एखाद्या चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटं राहणं बरं आहे. सत्य कधीही कटू असतं आणि हे सत्य मी स्वीकारलं आहे... असं अभिनेत्री म्हणाली. (manisha koirala tweet)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मनिषा पुढे म्हणाली, 'एखाद्या पुरुषाने मला पुन्हा दुःख पोहचावं या गोष्टीसाठी मझा विरोध आहे... ' अशी भावना अभिनेत्री मनिषा कोईराला हिने व्यक्त केली. आज मनिषा बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहत्यांमध्ये आजही चर्चेत असते. (manisha koirala picture)

मनिषा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली. अभिनेत्री मनीषा कोइराला देखील तिच्या अफेअर्समुळे तुफान चर्चेत आली. आयुष्य कोणी एकटं जगू शकत नाही. त्यासाठी एका साथीदाराची गरज असते. मनिषाने उद्योगपती सम्राट दहालसोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 

12 जणांसोबत प्रेम प्रकरण... सम्राट दहालसोबत लग्न... पण तरीही अभिनेत्री  आज एकटं आयुष्य जगते. महत्त्वाचं म्हणजे कर्करोगावर  मात केल्यानंतर अभिनेत्री आज आनंदी आयुष्य जगत आहे. (manisha koirala cancer)