मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी एकदा पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती इंडस्ट्रीपासून दूर गेलीये. हे खरं असलं तरी ती सोशल मीडियात चांगलीच अॅक्टीव असते आणि नेहमीच आपले खास फोटोज शेअर करत असते. मंदिरा ही नेहमीच फिटनेस आणि लूक्सबाबत सतर्क असते. आता पुन्हा एकदा तिने एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
मंदिराने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात तिने एक पांढ-या रंगाची चादर गुंडाळली आहे आणि या फोटोला तिने ‘सॅटरडे सोल, ब्लॅक अॅन्ड व्हाईट ओन्ली’ असं टायटल दिलं आहे.
मंदिरा ही ४५ वर्षांची आहे मात्र ती आजही आपल्या फिटनेसची इतकी काळजी घेते की, ती ४५ ची वाटत नाही. मंदिराला १९९४ मध्ये आलेल्या दुरदर्शनवरील ‘शांती’ मालिकेने लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मध्येही दिसली होती. त्यासोबतच २००३ मध्ये तिने क्रिकेट वर्ल्डकपही होस्ट केलं होतं आणि त्यानंतर आयपीएलमध्येही गाजली होती.
मंदिरा बेदीने २०१४ मध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये डेब्यू केलं आणि त्याआधी २०१३ मध्ये तिने एक साडी स्टोर उघडलं होतं. आता ती लवकरच एका वेब सीरीजमध्ये बघायला मिळणार आहे