मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी या त्यांच्या काळातील बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी नुकतंच एका म्युझिक व्हिडीओतून पुनरागमन केलं आहे. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानं मंदाकिनी यांना रातोरात प्रसिद्धी मिळवलेल्या मंदाकिनी हे नाव सगळ्यांच्या लक्षात राहिली. राज कपूर यांच्या या चित्रपटात मंदाकिनी यांनी बोल्ड सीन्स दिले, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
म्युझिक व्हिडिओची प्रमोशनवेळ करताना, मंदाकिनीनं हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या काळाबद्दल आणि त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, 'राम तेरी गंगा मैली याबद्दल सांगितले. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात वयाच्या 20 व्या वर्षी राज कपूर यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटातून मंदाकिनी यांना घराघरात ओळख मिळाली. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मंदाकिनी यांनी चित्रपट निर्माते राज कपूर यांना पहिल्यांदा भेटल्याबद्दल सांगितले.
'मला आठवतं ते म्हणाले होते की, जर तू जीन्स किंवा काही दुसरा ड्रेस परिधान करून आली असतीस, तर मला अजिबात आवडले नसते. मी त्यावेळी चुडीदार परिधान केला होता. कारण मला असं वाटलं की ते एक होमली मुलीच्या भूमिकेच्या शोधात होते,' असे मंदाकिनी म्हणाल्या.
पुढे अभिनेते कशा प्रकारे चित्रपटासाठी अभिनेत्री निवड करतात हे सांगताना मंदाकिनी म्हणाल्या, अभिनेत्री फक्त 3-4 गाण्यांसाठी, काही रोमॅंटिक सीन्ससाठी आणि शेवटी क्लायमॅक्ससाठी असतात. त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपटांमध्ये एवढंच काम होतं. अभिनेत्यांना मादक भाग आणि बहुतेकदा त्यांना कोणासोबत काम करायचे आणि कोणत्या अभिनेत्रीसोबत नाही हे ते ठरवतात. जर त्यांना कोणती अभिनेत्री आवडत नसेल तर ते निर्मात्यांना सांगायचे की त्या मुलीला घेऊ नका. '