Mandakini reveal face of Bollywood: बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यापासून मंदाकिनी दूर गेली असली तरी अजूनही चर्चेत आहे. 1985 साली मंदाकिनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण खऱ्या अर्थानं राज कपूरच्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. लग्नानंतर मंदाकिनी रुपेरी पडद्यापासून दूर गेली. मात्र आता पुन्हा एकादा 'माँ ओ माँ', या गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. मंदाकिनी या गाण्यातून आपला मुलगा रबिल ठाकुरला लाँच केलं आहे. यावेळी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मंदाकिनी 1980 च्या दशकातील बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणला आहे.
"त्या काळात हिरोइन्सना जास्त भाव मिळत नव्हता. त्यांचा फक्त काही गाणी आणि रोमँटिक सीन्ससाठी वापर केला जायचा. आम्हाला पूर्ण चित्रपटासाठी फक्त एक ते दीड लाख रुपये मिळायचे", असं मंदाकिनी यांनी सांगितलं. एखाद्या मुलीनं आपल्यापेक्षा कमी पैसे घेणार असं सांगताच दोन ते तीन दिवसात आधीच्या मुलीला काढलं जायचं, असंही मंदाकिनीनं सांगितलं.
"चित्रपटातील हिरो कोणासोबत काम करायचं हा निर्णय घ्यायचे. एकवेळ अशीही होती की एखादी मुलगी त्यांना आवडली नाही तर ते थेट सांगायचे ही नको, दुसरीला घ्या" असंही मंदाकिनी हिनं पुढे सांगितलं. याबाबत तुम्हाला काही अनुभव आला होता का? असं प्रश्न विचारताच तिनं सांगितलं, एक दोन वेळा मला असा अनुभव आला आहे.
"त्यांचा फक्त हिरोईनशी संबंध होता. आमच्या वाटेला दोन-तीन गाणी असायची. ही नाही तर दुसरी कुणीतरी करेल. असा माईंडसेट डायरेक्टर आणि प्रोड्युसरचा होता", असंही मंदाकिनीनं सांगितलं.