मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देल्या काही दिवसांपासून मजुरांना मदत करण्यात व्यस्त आहे. मुंबईसोबत देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरा पोहोचवण्यासाठी सोनू सूद मदत करत आहे. पण ही मदत फक्त घरी पोहोचण्यासाठीच मागितली जात आहे असं नाही तर इतर मदतही त्याच्याकडे मागितली जात आहे.
एका पठ्याने तर चक्क गर्लफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी सोनू सूदची मदत मागितली आहे. या मुलाने सोनू सूदला ट्विटरवर टॅग करून लिहिलं की,'भाई, मला कुठे तरी सोड मला गर्लफ्रेंडसोबत पळून जायचंय.' तो एवढ्यावरच थांबला नाही तर अंदमान किंवा निकोबारला सोड अशी मागणी केली. यावर अभिनेता सोनू सूदने देखील त्याला अगदी मजेशीर उत्तर दिलं आहे.
सोनूने या व्यक्तीला उत्तर देताना म्हटलं की,'माझ्याकडे यापेक्षा चांगली आयडिया आहे. तुमच्यासोबत मी तुमच्या कुटुंबियांना देखील पाठवू का? लागलीच लग्न देखील होऊन जाईल.' या उत्तराने पुन्हा एकदा सोनूच्या नावाची चर्चा होत आहे.
मेरे पास इस से बेहतर idea है। क्यूँ ना आप दोनो के साथ आप लोगों के परिवार को भी भेज दूँ। चट मँगनी और पट ब्याह। https://t.co/lDtfatY0ka
— sonu sood (@SonuSood) June 10, 2020
सोनू सूद विचारलेल्या या प्रश्नाला दुसऱ्या युझरने उत्तर दिलं आहे की,'लोकं स्वतःला काय समजतात. ही काय मस्करीची वेळ आहे का? कुणाची मदत करू शकत नाही मग असं ट्विट तरी करू नका?'