मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात धाडसी अभिनेत्रींपैकी एक मल्लिका शेरावतने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. मल्लिका तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे विशेष चर्चेत असते.
मल्लिका सोशल मीडियावर देखील कमालीची अॅक्टीव्ह असते.एका मुलाखती दरम्यान जेव्हा मल्लिकाला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, 'आई मला लग्न करायला सांगून कंटाळली आहे.
मल्लिका शेरावत लग्न कधी करणार याकडे सगळ्यांचच नजरा लागलेल्या असताना तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, आई म्हणते लग्न कर, तुला मोठे होण्यासाठी मदत मिळेल.
यावर मलायका म्हणते, पण मी अजून लग्नाचा विचार केलेला नाही. मला लग्नात रस नाही.
माझा योगानंद, विवेकानंदांवर विश्वास आहे, ते ब्रह्मचारी होते. कदाचित मी सुद्धा आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन. ' मल्लिका लवकरच एमएक्स प्लेयरच्या वेब सीरिज 'नकाब' मध्ये ईशा गुप्तासोबत दिसणार आहे.