Malaika Arora पुन्हा होणार नवरी, अर्जुनसोबत लग्नाची तारीख समोर!

Malaika Arora च्या आयुष्यात पुन्हा येणार आनंदाचा क्षण, अभिनेत्री होणार पुन्हा नवरी, अर्जुनसोबत लवकरचं अडकणार विवाह बंधनात...   

Updated: May 18, 2022, 02:40 PM IST
Malaika Arora पुन्हा होणार नवरी, अर्जुनसोबत लग्नाची तारीख समोर! title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अरबाज खानचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या जीवनात  एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली. मलायकाच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर. बॉलिवूडमधील सर्वात चर्चीत कपल म्हणजे मलायका आणि अर्जुन... गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. 

मलायका आणि अर्जुनचे चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराचं लग्न कधी होणार याचं प्रतीक्षेत आहेत. मलायका आणि अर्जुन लवकरचं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून दोघे प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देताना दिसत असून आता या दोघांनाही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मलायका 2022 च्या अखेरीस लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं कळत आहे. मलायका आणि अर्जुन लग्न मोठ्या थाटात करणार नसून सध्या पद्धतीत करणार आहे. 

अर्जुन आणि मलायकाच्या लग्नात फक्त कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मलायका आणि अर्जुन रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत.  शिवाय मित्रांना पार्टी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

दोघांच्या लग्नात कपूर कुटुंब आणि मलायकाच्या कुटुंबातील सदस्य सामील होतील असं समोर येत आहे. त्यामुळे सध्या रंगत असलेल्या चर्चेनंतर दोघे कधी लग्न बंधनात अडकतील या  प्रतीक्षेत दोघांचे चाहते आहेत.