'ज्यांच्यासाठी प्रेम...', अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोराची बोलकी पोस्ट

Malaika Arora Cryptic Post After Breakup News : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोरानं शेअर केली क्रिप्टिक पोस्ट...

दिक्षा पाटील | Updated: May 31, 2024, 03:59 PM IST
'ज्यांच्यासाठी प्रेम...', अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोराची बोलकी पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Malaika Arora Cryptic Post After Breakup News : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. या सगळ्यात आता त्या दोघांच्या विभक्त होण्याची बातमी समोर आली आहे. ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं ब्रेकअप झालं आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, अनेक सुत्रांनी कन्फर्म केलं की मलायका आणि अर्जुन, दोघांनीही जो काही निर्णय घेतलाय तो मिळून आणि अत्यंत सामंज्यस्याने घेतलाय. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की मलायका आणि अर्जुन यांच्यात स्पेशल नातं होतं. त्या दोघांच्या हृदयात एकमेकांसाठी प्रेम आणि आदर आहे. ते कायम एकमेकांच्या हृदयात राहतील. त्या दोघांनाही या नात्यावर कोणी काही वक्तव्य केलेलं आवडणार नाही. 'त्याचं एक सुंदर आणि बरीचवर्ष असलेलं हे नातं दुर्दैवानं संपलं आहे. याचा अर्थ हा नाही की दोघांमध्ये दुरावा आला असला तरी ते एकमेकांचा आजही आदर करतात आणि एकमेकांची स्ट्रेंथ आहेत. दोघांनी एकमेकांचा खूप आदर केला आहे. ते यापुढेही एकमेकांना इतकाच सन्मान देतील. बरीच वर्षे ते सीरियस रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांची इच्छा आहे की या भावनिक काळात त्यांना स्पेस देतील.'

malaika arora shares cryptic post after her and arjun kapoor s breakup news

ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मलायकानं प्रेम आणि पाठिंब्यावर वक्तव्य केलं आहे. मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की 'आपल्या पृथ्वीवर असलेला सगळ्यात मोठं खजिना ते लोक आहेत जे आपल्यावर प्रेम करतात आणि पाठिंबा देतात. त्यांना विकत घेऊ शकत नाही किंवा त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचे असे काही किंचित लोकं असतात.' मलायकानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : 'तिच्या जाण्यानं...' दलजीत कौरसोबत लग्नाचं नातं मोडताच बिझनेसमॅन पती असं का म्हणाला?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा ही 2018 मध्ये सुरु झाली. ते दोघं एकत्र एका फॅशन शोमध्ये दिसले होते. मलायकाच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या दोघांनी त्यांचं नात हे ऑफिशियल केलं होतं.