मलाइकाची अर्जुनसोबत रोमँटिक डिनर डेट, प्रेमात आकंठ बुडाले दोघं

मलाइका - अर्जुनचा रोमान्स पुन्हा चर्चेत 

Updated: Dec 7, 2021, 07:07 AM IST
मलाइकाची अर्जुनसोबत रोमँटिक डिनर डेट, प्रेमात आकंठ बुडाले दोघं  title=

मुंबई : मलाइका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या मालदीवमध्ये आपला खास वेळ घालवत आहेत. दोघंही सोशल मीडियावर फोटो शेअर करून मालदीवचा रोमँटिक अंदाज शेअर करत आहेत. या दोघांनी मालदीवमध्ये एक रोमँटिक डिनर डेटचा (Malaika - Arjun Romantic Dinner Date) आनंद घेतला आहे. ही डेट अनेक तरूणांना छान प्रेरणा देईल यात शंका नाही. 

अर्जुनने मलाइकाला सरप्राइज दिलं आहे. यामध्ये रोमँटिक डेटचा समावेश आहे. या डिनर डेटमुळे मलाइका खूप खूष असल्याचं कळतं. मालदीवचे सुंदर वातावरण आणि रोमँटिक क्षण या व्हिडीओत अनुभवता येत आहे. 

या व्हिडीओत फक्त मलाइका दिसत आहे. अर्जुनने समुद्र किनारी छान रोमँटिक डिनर डेटची व्यवस्था केली आहे. हा व्हिडीओ अनेकांना नक्की प्रेरणा देईल, यात शंका नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने नवीन अभिनेत्रीला देखील मागे टाकताना दिसत आहे. मलायकाच्या फोटोंमध्ये तिचा परफॉर्मन्स पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढते. मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (स्विमिंगपुलमध्ये मलायका बॉयफ्रेंडसोबत चावलतेय सायकल, अभिनेत्रीचा बिकिनीतील हॉट व्हिडीओ व्हायरल) 

 

मलायका अरोराही पापाराझींची आवडती आहे. जिमपासून योगा सेशनपर्यंत किंवा लंच-डिनरपर्यंत पापाराझी तिला फॉलो करतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा यूजर्स मलायकाच्या फिटनेस आणि फिगरची जोरदार प्रशंसा करतात, तर अनेक वेळा तिला ट्रोल केले जाते.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे, हे दिसून येते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. या दोघांच्या नात्याची चर्चा मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगत असते. त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा केल्यानंतर दोघेही मोठ्या सहजतेने लोकांसमोर येतात. दोघे अनेकदा आउटिंग आणि डिनर डेटला एकत्र जातात.