'पॅन्ट विसरलीस का?' मलायका हटके फॅशन करायला गेली खरी, पण झालं काही वेगळंच...

या आणि अशा कित्येक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

Updated: Feb 24, 2022, 04:56 PM IST
'पॅन्ट विसरलीस का?' मलायका हटके फॅशन करायला गेली खरी, पण झालं काही वेगळंच... title=

मुंबई : बॉलिवूडची फॅशन आयकॉन अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूपच चर्चेत असते. अर्जुनसोबतची डेट नाईट असो किंवा गर्लगँगसोबतची पार्टी असो मलायका तिच्या स्टाईल सेन्ससाठी विशेष ओळखली जाते.

दरम्यान, तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने हटके फॅशन करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. पण हा प्रयत्न फसल्याचं दिसून येत आहे.

कारण हा व्हिडिओ समोर येताच तिला ट्रोल केलं जात आहे. बॉलिवूड फोटोग्राफर्सकडून मलायका अरोराला स्पॉट करण्यात आलं आहे.त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये मलायका बिल्डींगमधून बाहेर पडताना दिसत आहे.

यादरम्यान,तिने पांढर्‍या शर्टवर बेज रंगाचा हाफ स्वेटर घातला आहे. हा लूक पुर्ण करण्यासाठी बुट घातले आहेत. मलायकाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्याला नेटिझन्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

काही मिनिटांतच या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. मलायकाला या लूकमुळे खूपच ट्रोल केलं जात आहे. तिने शर्ट आणि स्वेटर परिधान केला आहे, पण ती पॅन्टलेस दिसत असल्याने अनेक प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत लोकांनी मलायकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, 'तुम्ही पॅन्ट विसरलीस का?...' दुसऱ्याने लिहिले, 'मर्यादा ओलांडल्या आहेत'. या आणि अशा कित्येक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.